मालवण | प्रतिनिधी : लायन्स क्लब मालवण यांच्या वतीने लायन्स क्लब पदाधिकारी व सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा सत्कार समारंभ दैवज्ञ भवन येथे उत्साहात संपन्न झाला.
यावेळी लायन्स क्लब रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील, लायन्स क्लब माजी प्रांतपाल सुनील सुतार, झोन चेअरमन अनुष्का चव्हाण, लायन्स क्लब मालवण अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सचिव पुनम चव्हाण, खजिनदार राधिका मोंडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी यांसह पदाधिकारी उपस्थित होते.




यावेळी शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त पाल्यांचा विशेष गौरव करण्यात आला. अनुराग गांवकर, ओम चव्हाण, काव्या आचरेकर, निधी पटेल, आर्य दिवाणी, पूर्वा कांदळगांवकर, सारा शारबिद्रे, शर्विल शारबिद्रे, श्रीकृष्ण चव्हाण, मानसी चव्हाण, चार्वी मोंडकर, अन्वी मोंडकर, मोनिका कारेकर यांना सन्मानित करण्यात आले. काही मुले शिक्षणामुळे बाहेरगावी असल्याने अनुपस्थित होती त्यांच्या पालकांनी सन्मान स्वीकारला..
▪️अमित खोत, मालवण

