नगरपरिषद बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब मालवण अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त राजकोट मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने आयोजन
मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपरिषद बांधकाम सभापती तथा लायन्स क्लब मालवण अध्यक्ष सहदेव बापर्डेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिर राजकोट मित्रमंडळ मालवण यांच्या वतीने सोमवार 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेत दैवज्ञ भवन, मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे.
"रक्तदान करा, जीवनदान द्या" या सामाजिक संदेशातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे. असे आवाहन राजकोट मित्रमंडळ, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

भव्य रक्तदान शिबिर व मोफत नेत्र तपासणी शिबिर
