व्हाळीमध्ये मोठया प्रमाणात साचलेल्या कचऱ्याची समस्या मार्गी
बबन वाघ यांनी नगरसेवक मंदार ओरसकर यांचे मानले आभार
मालवण : मालवण शहरातील गवंडीवाडा प्रभाग क्रमांक 8 ब मधील कोदे घरासमोरील व्हाळीमध्ये मोठया प्रमाणात कचरा साचल्याने पावसाच्या वाहून जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहास अडचण निर्माण होत होती. याबाबत बबन वाघ यांनी नगरसेवक मंदार ओरसकर यांचे लक्ष वेधले.


मंदार ओरसकर यांनी तात्काळ मालवण नगरपरिषद प्रशासनास याबाबत माहिती दिली. त्यानुसार नगरपरिषद माध्यमातून साचलेला कचरा काढून तसेच साफसफाई करून व्हाळी प्रवाह सुरळीत करण्यात आला. मागणीची तात्काळ दखल घेऊन काम पुर्ण करून घेतल्याबद्दल नागरिकांनी नगरसेवक मंदार ओरसकर, नगरपरिषद प्रशासन यांचे आभार मानले आहेत. अशी माहिती बबन वाघ यांनी दिली.

