Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा जाहीर पाठिंबा

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा जाहीर पाठिंबा


सिंधुदुर्ग : शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी, भ्रष्टाचार तसेच विविध प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री. सुकटे साहेब यांना संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. अजय शिंदे व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) राज्य प्रतिनिधी श्री. अशोक गिते यांनी प्रत्यक्ष भेटून सादर केले.

यावेळी शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी, भ्रष्टाचार तसेच इतर गंभीर समस्यांवर प्रभावी उपाययोजना करून शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व विश्वासार्हता निर्माण करण्याची मागणी करण्यात आली. केंद्र शासनाने शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली.

'Save Education, Save Nation' या भूमिकेचा पुनरुच्चार करत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास नैतिक पाठिंबा जाहीर केला असून, शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी संघटना सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री. सुकटे साहेब यांनी निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

ruchira top