Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

किल्ले सिंधुदुर्गच्या ढासळलेल्या बुरुजाची भारतीय पुरातत्व विभाग कडून पाहणी

किल्ले सिंधुदुर्गच्या ढासळलेल्या बुरुजाची भारतीय पुरातत्व विभाग कडून पाहणी


मालवण | प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पूर्वेकडील बुरुजाच्या तळभागातील तटबंदीचा काही भाग ढासळल्याचे वृत्त माध्यमांतून प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग श्रीमती तृप्ती धोडमिसे यांनी त्याची तात्काळ दखल घेऊन  महसूल प्रशासनामार्फत ASI यांना पत्र लिहून सदर ठिकाणी पाहणी व पुढील अनुषंगिक कार्यवाही करणेबाबत कळविले होते. त्यानुसार भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (Archaeological Survey of India), मुंबई मंडळाचे अधीक्षक पुरातत्त्वविद डॉ. अभिजित आंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड उप-मंडल चे संरक्षण सहाय्यक संकेत कावलकर, मालवण तहसीलदार गणेश लव्हे, देवबाग ग्राम महसूल अधिकारी श्री वायाळ व त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांनी नुकतीच सिंधुदुर्ग किल्ल्यावरील अलीकडेच ढासळलेल्या बुरुजाच्या भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.
या पाहणीदरम्यान ढासळलेल्या बुरुजाची सद्यस्थिती, तटबंदीची संरचनात्मक स्थिरता, दगडी बांधकामाची अवस्था तसेच समुद्री लाटा, भरती-ओहोटी आणि पावसामुळे झालेल्या परिणामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आवश्यक तांत्रिक निरीक्षणे व मोजमाप करून संवर्धनासाठी उपयुक्त माहिती संकलित करण्यात आली.

पाहणीनंतर संबंधित निरीक्षणांचा सविस्तर अहवाल भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई मंडळाकडे सादर करण्यात येणार असून, त्यानुसार किल्ल्याच्या संवर्धन व आवश्यक दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या अलीकडील पडझडीमुळे त्याच्या संवर्धनाची गरज अधिक अधोरेखित झाली असून, ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

ruchira top