नगरसेवक रविकिरण तोरसकर यांचे आवाहन
मालवण : मालवण व किनारपट्टी भागातील व्यक्तींचे सोने तारण ठेवून संबंधित रकमेवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. या प्रकरणात अनेक मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक, महिला तसेच इतर नागरिकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे बोलले जात आहे.
या प्रकरणी वस्तुस्थिती जाणून घेत फसवणूक ग्रस्तांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचविण्या साठी पालकमंत्री नितेश राणे यांची शिष्टमंडळामार्फत भेट घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक रविकिरण चिंतामणी तोरसकर यांनी दिली आहे.
ज्या व्यक्तींची या प्रकरणात आर्थिक फसवणूक झाली आहे, त्यांनी पुढे येऊन संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. फसवणुकीबाबतची माहिती व आवश्यक कागदपत्रांसह नागरिकांनी नगरसेवक रविकिरण तोरसकर मोबा : 9422633518 किंवा 9373958726 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

सोने तारण गैरव्यवहार प्रकरण | फसवणूकग्रस्तांनी संपर्क करावा
