विनायक राऊत आणि कुटुंबीयांना अटक का नाही? : आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केले सवाल
मालवण | प्रतिनिधी : जादूटोणा, महिलेवर अत्याचार अश्या गंभीर आरोप अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या विनायक राऊत आणि कुटुंबीयांना अद्याप अटक का नाही? असा रोखठोक सवाल आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केला आहे.
आमदार निलेश राणे यांनी या प्रकरणी भूमिका मांडताना सांगितले, आमच्यावर एक साधी FIR होते तेव्हा पोलीस 24 तासांमध्ये अटक करायला निघतात, इथे माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांवर FIR रजिस्टर होऊन एक आठवडा झाला, त्यांची अँटिसिपेटरी बेल रिजेक्ट झाली तरीदेखील त्यांच्या दिशेने कोण अटक करायला जात नाही. त्यांच्यावर जादूटोणा आणि एका महिलेवर अत्याचार असे गंभीर आरोप आहेत, मला कारण कळलेलं नाही??? असे आमदार निलेश राणे यांनी म्हटले आहे.

जादूटोणा, महिलेवर अत्याचार असे गंभीर आरोप ; गुन्हा दाखल
