Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी मालवणात दाखल

दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी मालवणात दाखल


मालवण पंचायत समिती येथे अधिकाऱ्यांचे स्वागत : दशावतार कलाकारांची अधिकाऱ्यांकडून नोंदणी

मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांच्या मागणी पाठपुराव्यातून दशावतार कलाकारांना शासन दरबारी न्याय मिळाला. महायुती सरकार माध्यमातून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कलाकार अनुदानात भरघोस वाढ जाहीर केली. कलाकारांची शासन दरबारीं नोंद होऊन त्यांना ओळखपत्रही मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. शुक्रवारी या अधिकाऱ्यांनी मालवण पंचायत समिती येथे उपस्थित राहात मालवण तालुक्यातील दशवतार कलाकार यांची नोंदणी केली. 107 दशावतार कलाकार यांची नोंदणी यावेळी करण्यात आली आहे.

दरम्यान, मालवण तालुक्यातील ज्या दशावतार कलाकारांची नोंदणी झाली नाही त्यांनी दशावतार संघटना मालवण तालुका सचिव विनायक येरागी यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर नोंदणी पुर्ण करावी. असे आवाहन पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटना सिंधुदुर्ग, मालवण शाखा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात दशावतार कलाकारांचे प्रश्न व्यथा ठामपणे मांडल्या. दशावतार कलाकारांना शासन दरबारी हक्काचा न्याय मिळवून देण्यात आमदार निलेश राणे यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. यासोबत दशावतार कलाकारांची अधिकृत नोंद करून त्यांना पुढील लाभ मिळावेत आणि एकही कलाकार या लाभापासून वंचित राहू नये यासाठी दशावतार कलाकार नोंदणी करण्यात यावी अशीही भूमिका आमदार निलेश राणे यांनी मांडली. त्यानुसार सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या निर्देशानुसार सांस्कृतीक कार्य संचालनालयाचे अधिकारी दशावतार कलाकार सर्वेक्षण आणि नोंदणी साठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत.

शुक्रवारी सांस्कृतीक कार्य संचालनालय सांस्कृतिक विभाग मुंबईचे सहाय्यक संचालक जयश्री घुगे, लेखाधिकारी गायत्री वेजारे, लिपिक सहदेव खैरे मालवण पंचायत समिती येथे दाखल झाले. यावेळी गटविकास अधिकारी परागिणी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, उपसभापती घनश्याम झाड,पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघटना सिंधुदुर्ग, मालवण शाखा अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर,
उपाध्यक्ष ओमप्रकाश चव्हाण, सचिव विनायक येरागी,सह सचिव विनोद परब,सल्लागार चंद्रकात खोत,खजिनदार नितीन घाडीगावकर, सदस्य भास्कर मुसळे, श्रेयश खोत, दिनेश राऊळ, रुपेश चौकेकर, सुधीर तांडेल, सुहास माळकर, भाई मांजरेकर यांसह दशावतार कलाकार उपस्थित होते. मालवण तालुक्यातील 107 कलाकारांची नोंद दिवसभरात करण्यात आली. अशी माहिती देण्यात आली.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top