मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी मालवण कार्यालय येथे बुधवार २२ जुलै रोजी महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदानासारखे पवित्र दान कार्य करावे. असे आवाहन भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर व शहर प्रभारी पंकज सादये यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मालवणात भाजपच्या वतीने महारक्तदान शिबीर
