Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

कुंभारमाठ कातकरी वस्ती येथे सोलार हायमास्ट उभारणी...

कुंभारमाठ कातकरी वस्ती येथे सोलार हायमास्ट उभारणी...

आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे सरपंच पुनम मनोज वाटेगावकर यांनी मानले आभार

मालवण | प्रतिनिधी :
ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना सन २०२५-२०२६ अंतर्गत ग्रामपंचायत कुंभारमाठ कार्यक्षेत्रातील कातकरी वस्ती येथे रुपये ५ लाख निधीतुन मंजूर सोलार हायमास्ट उभारणी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायत कुंभारमाठच्या वतीने सरपंच पुनम मनोज वाटेगावकर यांनी लोकप्रिय, कार्यक्षम व विकासाभिमुख आमदार निलेश राणे तसेच खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
गावातील विकासकामासाठी मोलाचे सहकार्य नेहमीच मिळतं असल्याचे त्यांनी सांगितले.

सरपंच वाटेगावकर यांनी सांगितले, आमदार निलेश राणे साहेब यांचे आम्ही विशेष ऋणी आहोत. ग्रामपंचायतच्या मागण्यांची नेहमीच दखल घेऊन ग्रामीण तसेच आदिवासी भागाच्या विकासाला प्राधान्य देण्याची त्यांची कार्यपद्धती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कुंभारमाठ ग्रामपंचायत क्षेत्रातील कातकरी समाजाच्या गरजा लक्षात घेऊन यापूर्वीही त्यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि विकासाविषयीच्या सकारात्मक भूमिकेमुळे निधी मंजूर होऊन कातकरी वस्तीमध्ये सोलार हायमास्ट उभारण्यात आला आहे. या कामामुळे परिसर प्रकाशमान होण्यास व सुरक्षितता वाढण्यास, नागरिकांना रात्रीच्या वेळी अधिक सोयी उपलब्ध होण्यास आणि वस्तीच्या विकासाला नवी दिशा मिळण्यास निश्चितच मदत होईल.

आपल्या सर्वांचे लाडके आमदार, खासदार तसेच पालकमंत्री या सर्वामुळे ग्रामपंचायत कुंभारमाठ परिसरातील विकासकामांना निश्चितच अधिक गती मिळेल, असा विश्वासही सरपंच सौ. पुनम मनोज वाटेगांवकर यांनी व्यक्त केला.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top