Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी सिंधुदुर्गात

दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी सिंधुदुर्गात


आमदार निलेश राणे यांनी केले स्वागत

मालवण | प्रतिनिधी : दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील अधिकारी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत. आमदार निलेश राणे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हापरिषद उपाध्यक्ष दादा साईल, देवेंद्र नाईक, अरविंद करलकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या मागणीनंतर दशावतार कलाकारांना शासन दरबारी हक्काचा न्याय मिळाला आहे. सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ट अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असून त्यांनी आज पासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे. दशावतारी कलाकारांच्या नोंदणीसाठी मंत्रालयातील हे अधिकारी सिंधुदुर्गात दाखल झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांची अधिकृत नोंद करून त्यांना पुढील लाभ मिळावेत आणि एकही कलाकार या लाभापासून वंचित राहू नये यासाठी ऑनलाइन नोंदणी न करता मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्षात जिल्ह्यात येऊन काम करण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी सभागृहात केली होती, त्यानंतरवाज संबंधित खात्याचे अधिकारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. पुढील काही दिवस जिल्ह्यात थांबून प्रत्येक तालुक्यात जाऊन हे अधिकारी दशावतार कलाकारांच्या भेटीगाठी घेऊन नोंद गोळा करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेल्या अधिकाऱ्यांचे आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे स्वागत केले. यावेळी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top