Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

वादळी वाऱ्यांत घराचे छप्पर कोसळलेल्या कुटुंबाला शिवसेनेचा 'आधार"

वादळी वाऱ्यांत घराचे छप्पर कोसळलेल्या कुटुंबाला शिवसेनेचा 'आधार"


बेलाचीवाडी येथील कुटुंबाला शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांचा मदतीचा हात

छप्पराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक सर्व साहित्य स्वखर्चातून केले उपलब्ध

मालवण | प्रतिनिधी : वादळी वाऱ्यांत घरावर झाड कोसळून छप्पर कोसळलेल्या बेलाचीवाडी येथील अनिल राघो परब कुटुंबाला मालवण तालुका शिवसेनेने हक्काचा 'आधार" दिला आहे. नुकसानग्रस्त परब कुटुंबाला शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी मदतीचा हात देताना छप्पर दुरुस्तीसाठी आवश्यक सर्व साहित्य स्वखर्चातून उपलब्ध केले आहे. आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनानुसार सामाजिक व कौटुंबिक भावनेतून मदतकार्य केल्याचे तालुकाप्रमुख विनायक बाईत यांनी सांगितले.
मालवण तालुक्यातील बेलाची वाडी येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनिल राघो परब यांच्या राहत्या घरावर सागाचे झाड कोसळून घराचे छप्पर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. या घटनेची तातडीने दखल घेत शिवसेना मालवण उप तालुकाप्रमुख जितेंद्र (बाबू) परब यांनी अनिल कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेत घरावरील झाड हटवून अनिल परब यांना संकटातून बाहेर काढले.

याबाबत माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तालुका प्रमुख विनायक बाईत आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्यानुसार तालुका प्रमुख विनायक बाईत यांनी स्वखर्चातून घराच्या छप्पराच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य उपलब्ध करून दिले. त्यामुळे उद्ध्वस्त झालेले छप्पर आता पुन्हा पूर्ववत करण्यात येणार आहे.
यावेळी तालुका प्रमुख विनायक बाईत म्हणाले, "शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारधारेनुसार आम्ही कार्य करत आहोत. आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनातून जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होत, मदत करण्याचा आमचा प्रयत्न असतो, त्याच भावनेतून कार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या विभागात काम करतं असताना माजी बांधकाम सभापती व ज्येष्ठ शिवसेना कार्यकर्ते अनिल कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने परिसरातील जनतेला विविध प्रसंगी न्याय व दिलासा देण्याचे कार्य शिवसेनेच्या माध्यमातून सातत्याने सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी तालुका प्रमुख विनायक बाईत यांच्यासह पंचायत समिती सदस्य तथा शिवसेना गटनेते संजय (छोटू) ठाकूर, उपतालुका प्रमुख जितेंद्र परब, विभागीय अध्यक्ष प्रशांत परब, प्रवक्ते निलेश बाईत, विभागीय सचिव मंगेश यादव, मसुरे विभाग अल्पसंख्याक प्रमुख इस्माईल शेख, मालोंड-बेलाची वाडी उपसरपंच लक्ष्मण चव्हाण, माजी सरपंच हेमंत पारकर, माजी उपसरपंच नाना परब, माजी सरपंच सुभाष परब, संदीप परब, दिलीप परब, स्वप्नील दळवी तसेच घरमालक अनिल परब उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top