Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

आमदार निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव

आमदार निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव


मालवण पंचायत समिती सभा संपन्न : विविध विषयावर चर्चा


मालवण | प्रतिनिधी : दशावतार कलाकारांना शासन दरबारी न्याय हक्क मिळवून देण्यात आमदार निलेश राणे यांनी महत्वाची भूमिका बजावली. अधिवेशनात जनतेचे प्रश्न ठाममपणे मांडून त्यांना आमदार निलेश राणे यांनी न्याय मिळवून दिला. तसेच मालवण ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त करून घेताना आरोग्य सेवेच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावणारे आम. निलेश राणे यांच्या अभिनंदनाचा ठराव शिवसेना गटनेते बंडू चव्हाण, भाजपा गटनेते दिपक सुर्वे, सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी मांडला याला सदस्यांनी अनुमोदन दिले. आमदार निलेश राणे यांचे विशेष अभिनंदन यावेळी करण्यात आले.

मालवण पंचायत समितीची मासिक सभा छत्रपती संभाजी राजे सभागृहात सभापती प्रज्ञा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा पार पडली. या सभेला उपसभापती घनश्याम झाड, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, तसेच पंचायत समिती सदस्य दीपक सुर्वे, रिया बावकर, योजना कांबळी, माधुरी मसुरकर, मानसी भोगावकर, छोटू ठाकूर, गणेश तोंडवळकर, बंडू चव्हाण आणि विविध शासकीय खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पं. स. सदस्यांनी स्मार्ट मीटरच्या विषयावरून भूमिका मांडली. बंडू चव्हाण यांनी यांनी अधिक आक्रमक भूमिका मांडली. यावेळी वीज विषयक इतर समस्याही सदस्यांनी मांडल्या. सध्या पावसात झाडाच्या फ़ांद्या वीज वाहिन्यांवर कोसळून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असून अशावेळी रात्री अपरात्री वीज कर्मचाऱ्यांची तारांबळ उडून रात्री उशिरापर्यंत वीज दुरुस्तीचे काम करत असतात. पावसात अशी धावपळ करण्यापेक्षा पावसाच्या आधी धोकादायक फ़ांद्या छाटण्याचे काम वीज विभाग का करत नाही, रात्रीच्या वेळी काम करताना वीज कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका पोहचल्यास त्यास जबाबदार कोण असा सवाल भाजपचे गटनेते दीपक सुर्वे यांनी करत रात्रीच्या वेळी वीज कर्मचाऱ्यांना कामाला लावू नये, असे वीज अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच कांदळगाव मध्ये भूमिगत वीज वाहिनी साठी रस्त्यांच्या कडेला लावलेले लाल रंगाचे काही बॉक्स मुसळधार पावसात कोसळले असून या कामात नित्कृष्टपणे काम केले जात असल्याचा आरोप सदस्या योजना कांबळी यांनी केला. सदर कोसळलेले बॉक्स सुस्थितीत लावले जातील असे यावेळी वीज अभियंता श्री. म्हेत्रे यांनी सांगितले.

यावेळी तालुक्यात विविध ठिकाणच्या एसटी बस फेऱ्या बंद असल्याबाबत तसेच बस फेऱ्यांच्या वेळेतील अनियमिततेबाबत एसटी आगाराच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. बस फेऱ्या सुरळीत कराव्यात असे दीपक सुर्वे यांनी सांगितले तसेच पणजी गाडी सुरु करावी असे सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी सांगितले. तसेच एसटी प्रवाशांना देण्यात येणारे प्रवासी ओळखपत्र साठी गावागावात शिबीरे घ्यावीत असे बंडू चव्हाण यांनी सूचित केले.


मसुरे - डांगमोडे रस्त्याचे काम गेले अनेक महिने रखडल्याबाबत सदस्य छोटू ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेतली. सदर रस्त्याचे काम अर्धवट असून त्यावर अनेक अपघात घडत आहेत, रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या.ज्या शाळेत नियुक्त केलेले शिक्षक अजूनही हजर झालेले नाही त्या शिक्षकांना नोटीस काढा, अशा सूचना सभापती प्रज्ञा चव्हाण यांनी दिल्या.

तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये १० अंगणवाडी सेविका व ९ मदतनीस पदे रिक्त असून मदतनीस यांच्या पदोन्नतीद्वारे अंगणवाडी सेविकांची पदे भरण्यात येणार असल्याची माहिती यावेळी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाकडून देण्यात आली. कुंभारमाठ येथील म्हाडा वस्तीच्या परिसरात लोकसंख्या व मुलांची संख्या वाढली असून तेथे निकष पाहून अंगणवाडी सुरु करण्याची मागणी यावेळी मानसी भोगावकर यांनी केली. तर चिंदर येथे हवामान मापक यंत्र बसवावे, शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. अशी मागणी दीपक सुर्वे यांनी केली. दिपक सुर्वे, माधुरी मसूरकर यांनीही मतदार संघातील विविध विषय मांडले.

ruchira top