नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते उद्घाटन
मालवण | प्रतिनिधी : मालवण येथील एस. टी. स्टँड परिसरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एस. टी.) आणि वसुंधरा जनकल्याण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी वृक्षलागवडीचे महत्त्व, पर्यावरण संवर्धनातील वृक्षांची भूमिका तसेच मानवी जीवनासाठी वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाचीही जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास आगार व्यवस्थापक अनिरुद्ध शशिकांत सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक सतीश शरद वाळके, लिपिक दिलीप हिंदळेकर, वाहतूक नियंत्रक सुधाकर मालंडकर व अमित शंकरदास, प्रमुख कारागीर भिकाजीराव पळसंबकर, वसुंधरा जनकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर, सदस्य स्वप्नील मिटकर, ॲड. रत्नदीप कदम, हर्षल केळुसकर, निकित वराडकर, रमेश परब, अशोक बागवे आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच प्रथमेश शैलेश काळसेकर (वयम फॉरेस्ट नर्सरी, काळसे) यांचे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य लाभले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणारा हा वृक्षारोपण उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

मालवण एस. टी. स्टँड परिसरात वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश
