Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

पालकमंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशने मानले आभार

पालकमंत्री नितेश राणे यांचे सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशने मानले आभार


पालकमंत्री नितेश राणे यांच्या दूरदृष्टीने जिल्हा क्रीडा संकुलातील सहा बॅडमिंटन कोर्टची निर्मिती

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे यांचे मोठे योगदान


कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने जिल्हा क्रीडा संकुल, सिंधुदुर्ग येथे सहा बॅडमिंटन कोर्टांची निर्मिती पूर्ण झाल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानण्यात आले आहेत.
याबाबत असोसिएशनने १५ जुलै २०२६ रोजी पालकमंत्री नितेश राणे यांना पत्र पाठवून कृतज्ञता व्यक्त केली आहे. पत्रात नमूद केल्याप्रमाणे, पालकमंत्र्यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनामुळे, सकारात्मक सहकार्यामुळे आणि क्रीडा विकासासाठी असलेल्या बांधिलकीमुळे जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूंना आधुनिक व दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध झाली आहे.
या सुविधेमुळे खेळाडूंना नियमित सराव, प्रशिक्षण तसेच जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी अधिक सक्षमपणे तयारी करण्याची संधी मिळणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.
तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाबद्दल असोसिएशनने मनःपूर्वक आभार व्यक्त केले असून, भविष्यातही असेच मार्गदर्शन व सहकार्य लाभेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

ruchira top