मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॅटेराइट स्टोन, लॅटेराईट ब्रिक्स (चिरा) उत्खनन संदर्भात निर्माण झालेल्या समस्येबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिरेखाण व्यवसायिक यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन लक्ष वेधले व आपल्या समस्या मांडल्या. हजारो रोजगार ठप्प होण्याची भीती व्यक्त केली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, तसेच सिंधुदुर्ग माईणर मिनरलर्स एक्स्कॅव्हेटरर्स आणि ट्रान्सपोर्टर्स असोसिएशन, सिंधुदुर्ग यांच्या वतीने चिरेखाण व्यवसायिक राजा गावडे, पापा मालंडकर, सुबोध पालव, बिजी गावडे, दत्ता गावडे, बंड्या गावडे, सचिन आंबेरकर, भाऊ चव्हाण, वळंजू, गावडे यासह अन्य व्यवसायिक उपस्थित होते.
▪️अमित खोत, मालवण

