Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

सदैव दशावतार कलावंतांसोबत राहणार : आमदार निलेश राणे

सदैव दशावतार कलावंतांसोबत राहणार : आमदार निलेश राणे

पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने आ. निलेश राणे यांचा सत्कार

दशावतार कलाकारांनी सदिच्छा भेट घेत व्यक्त केली कृतज्ञता

मालवण | प्रतिनिधी : कोकणची पारंपरिक दशावतार लोककला जपणायचे आणि समृद्ध ठेवण्याचे कार्य माझा दशावतार कलावंत करत असताना अनेक वर्ष न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करत होता. हा संघर्ष मी प्रत्यक्ष बघितला आहे. शासन दरबारी दशावतार कलावंतांना न्याय मिळवून देत असताना सदैव सोबत राहणार. असा विश्वास आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केला.

मी विधिमंडळात दशवतार कलाकार यांचा आवाज बनलो. मात्र यासाठी सातत्याने दत्ता सामंत यांचा पाठपुरावा महत्वाचा राहिला. महायुती सरकारच्या माध्यमातून सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी या कलावंतांना शासन दरबारी न्याय देण्याची घोषणा केली. लवकरच याबाबत शासन निर्णय होईल. दशावतार कलावंत हे कुटुंब असून मी सोबतच राहणार. असेही आमदार निलेश राणे यांनी सांगितले.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांनी मालवण येथे आमदार निलेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली.आमदार निलेश राणे यांची झालेली ही भेट ही कृतज्ञता सोहळा ठरली. विधानसभेत दशावतार कलाकारांच्या मागण्यांचा आवाज ठामपणे उठवत आम्हाला आमदार निलेश राणे यांनी शासन दरबारी न्याय मिळवून दिला. असे सांगत पारंपारिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने अध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू कोचरेकर यांच्या हस्ते आमदार निलेश जी राणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नेहमी दशावतार कलाकारांच्या हाकेला साथ देणारे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचाही यात मोलाचा वाटा आहे. असे सांगत त्यांचाही सन्मान करण्यात आला.


सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच कोकणात दशावतार कलावंत यांचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करून ऋण व्यक्त केले जाणार आहेत. असेही दशावतार कलावंत यांनी सांगितले.


यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, सोशल मीडिया प्रमुख किसन मांजरेकर यांसह अन्य पदाधिकारी व दशावतार कलावंत मोठया संख्येने उपस्थित होते.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top