Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

नाविन्याचा ध्यास घेऊन मुलांनी विविध क्षेत्रात प्रगती साधावी - डॉ. रत्नाकर कोयंडे

नाविन्याचा ध्यास घेऊन मुलांनी विविध क्षेत्रात प्रगती साधावी - डॉ. रत्नाकर कोयंडे

मालवण तालुका गाबित समाजतर्फे गुणवंतांचा सत्कार

मालवण | प्रतिनिधी:-
आजच्या बदलत्या युगात मिळणाऱ्या संधीचा आणि वेळेचा उपयोग मुलांनी आपल्या प्रगतीसाठी केला पाहिजे, यासाठी वेळेचे नियोजन करून मेहनत करावी, नाविन्याचा ध्यास घेऊन गाबीत समाजातील मुलांनी विविध क्षेत्रात प्रगती साधावी, असे प्रतिपादन डॉ. रत्नाकर कोयंडे यांनी येथे बोलताना केले.

मालवण तालुका गाबित समाजच्या वतीने दहावी आणि बारावी परीक्षा २०२५-२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या मालवण तालुक्यातील सर्व गाबित विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा गुणगौरव समारंभ मालवण धुरीवाडा येथील संस्कार हॉलमध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रत्नाकर कोयंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गाबित समाज सिंधुदुर्गचे अध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, प्रमुख पाहुणे इंजिनियर लक्ष्मीकांत खोबरेकर, गाबित समाज मालवणचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर, मालवणचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सुदेश आचरेकर, नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर, नगरसेविका मेघा सावंत, दर्शना कासवकर, स्वीकृत नगरसेवक रविकिरण तोरसकर, जिल्हा सचिव महेंद्र पराडकर, संदेश कोयंडे, माजी नगरसेविका सौ. सेजल परब, देवबाग हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. रचना खोबरेकर आदी उपस्थित होते.


यावेळी आरोग्य क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविले गेलेले डॉ. रत्नाकर कोयंडे यांचा गाबीत समाजतर्फे सत्कार करण्यात आला. तसेच मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेले गाबीत समाजातील नगरसेवक सुदेश आचरेकर, सहदेव बापर्डेकर, रविकिरण तोरसकर, दर्शना कासवकर, अन्वेषा आचरेकर, मेघा सावंत यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी दहावी व बारावी परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या मुलांना रोख रक्कमेची पारितोषिके देण्यात आली. तसेच सतीश खवणेकर, सान्वी कुबल, सिया वाघ यांचा विशेष कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.


यावेळी डॉ. रत्नाकर कोयंडे यांनी त्यांचे वडील कै. गोविंदा तुकाराम कोयंडे यांच्या स्मरणार्थ पुढील वर्षीपासून मालवण तालुका गाबीत समाज विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमासाठी आणि दहावी व बारावीतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देण्यासाठी दरवर्षी रोख रुपये पंचवीस हजार देण्याचे जाहीर केले.


सत्कार ते अध्यक्षपद

या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविणारे डॉ. रत्नाकर कोयंडे यांचा १९९६ साली गाबित समाजातर्फे दहावी परीक्षेतील यशासाठी सत्कार करण्यात आला होता. आज तीस वर्षानंतर ते याच गाबीत समाजाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले. सत्कार ते अध्यक्षपद भूषवेपर्यंतच्या त्यांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील यशाचे यावेळी उपस्थित सर्वांनी कौतुक केले.


यावेळी लक्ष्मीकांत खोबरेकर यांनी मार्गदर्शन करताना मुलांमध्ये मोबाईल वापरण्याचे प्रमाण वाढले असून ते कमी करण्यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजे, पालकांनी मुलांशी संवाद साधताना त्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवले पाहिजे, असे सांगितले. तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर यांनी आज एआय तंत्रज्ञानाचे शिक्षण महत्वाचे ठरले असून विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, मुलांना करिअर मार्गदर्शनासाठी गाबीत समाजाकडून प्रयत्न केले जातील, असे सांगितले. यावेळी उपस्थित इतर मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन महेंद्र पराडकर यांनी केले. आभार सेजल परब यांनी मानले.

यावेळी राधिका कुबल, दिक्षा ढोके, अन्वेषा मालंडकर, मिथुन मालंडकर, सहदेव साळगावकर, भाऊ मोर्जे, नरेश हुले, दादा वाघ, रुपेश खोबरेकर, संतोष ढोके, आनंद खडपकर, पवनकुमार पराडकर, भूषण मेतर आदी व इतर गाबित समाज बांधव, भगिनी, विद्यार्थी व पालक उपास्थित होते.

ruchira top