Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

गतिमान विकासासोबत जनतेला तत्पर सेवा सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध!

गतिमान विकासासोबत जनतेला तत्पर सेवा सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध!


विकासकामांसाठी कोट्यावधी निधी : आरोग्य सेवेच्या दृष्टीने रिक्त जागी तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती

मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी नागरिकांच्या वतीने मानले आ. निलेश राणे यांचे आभार

मालवण : गतिमान विकासातून कुडाळ मालवण मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार निलेश राणे सातत्याने प्रयत्नाशील असून शेकडो कोटी निधी मतदारसंघात प्राप्त झाला आहे. 21 व्या शतकातील आदर्श असे मालवण मालवण शहर घडवणार या संकल्पनेतून मालवण शहाराच्या विकासासाठीही सातत्याने मोठा निधी आमदार निलेश राणे उपलब्ध करून देत आहेत. सोबतच जनतेला तत्पर सेवा सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठीही आमदार निलेश सातत्याने प्रयत्नाशील आहेत. त्यांच्या यशस्वी पाठपुराव्यातून मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टर नियुक्ती झाली आहे. मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासोबत जनतेला तत्पर सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी आमदार निलेश राणे कटीबद्ध आहेत असे सांगत मालवण नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी उपनगराध्यक्ष व महायुतीच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने आमदार निलेश राणे, महायुती सरकार तसेच खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांचे नागरिकांच्या वतीने आभार मानले आहेत.

ममता वराडकर यांनी सांगितले, नमो उद्यान, रॉक गार्डन सुशोभीकरण, मामा वरेरकर नाट्यगृह अत्याधुनिक सुविधा व नूतनीकरण यांसह विविध विकासकामांसाठी मोठा निधी उपलब्ध झाला आहे. जनहिताच्या दृष्टीने अनेक विकास प्रकल्प प्रस्तावित आहेत. सोबतच सिंधुदुर्गनगरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मालवण शहर देऊळवाडा रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी तब्ब्ल 302 कोटी निधी मंजूर करून आणला.

आमदार निलेश राणे यांच्या रूपाने व्हिजन असलेले नेतृत्व मालवण कुडाळ मतदार संघाला लाभले असून विलासकामातून मतदारसंघ प्रगतीपथावर आहे. असे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले.

विधानसभेतील जनतेचा आवाज

आपल्या अभ्यासपूर्ण आणि ठाम भूमिकेतून जनतेचे प्रश्न प्रत्येक अधिवेशनात प्रभावीपणे मांडून सर्व स्तरातील जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य आमदार निलेश राणे सातत्यपूर्ण करत आहेत. शेतकरी, कष्टकरी, मच्छिमार, आंबा काजु बागायतदार, दशावतार कलावंत या सर्वाना न्याय मिळवून देताना आ. निलेश राणे म्हणजे विधानसभेतील जनतेचा आवाज ठरले आहेत. असे नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी सांगितले.

ruchira top