Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

इयत्ता दहावी, शिष्यवृत्ती, गणित प्रज्ञा व NMMS परीक्षेतील गुणवंतांचा गौरव समारंभ

इयत्ता दहावी, शिष्यवृत्ती, गणित प्रज्ञा व NMMS परीक्षेतील गुणवंतांचा गौरव समारंभ


मालवण |प्रतिनिधी : अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण येथे दि. १० जुलै २०२६ रोजी इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी तसेच शिष्यवृत्ती, गणित प्रज्ञा व NMMS परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात सन २०२५–२६ च्या एस.एस.सी. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा संस्थेतर्फे गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय श्री. मयेकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. खंडाळेकर सर तसेच शाळेच्या माजी शिक्षिका सौ. श्रुती बांदेकर उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात इयत्ता दहावीतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, गणित प्रज्ञा परीक्षा आणि NMMS परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळा व संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांचा टोपीवाला विद्यार्थी सहकारी भांडारतर्फे विशेष सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशामागे मोलाचे योगदान देणाऱ्या तसेच आपल्या विषयात विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळवून देणाऱ्या शिक्षकांचाही संस्थेतर्फे गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व पालकांनी मनोगत व्यक्त करताना शाळेने दिलेले मौल्यवान शिक्षण, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण सहकार्य याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये शाळेचे संस्कार, शिक्षकांची मेहनत आणि सहकार्य यांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. वळंजू सर यांनी केले. श्री. बर्वे सर व सौ. बुवा मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. याच कार्यक्रमात सौ. तांबे मॅडम यांची कराओके स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी निवड झाल्याबद्दल, तसेच श्री. सुधीर गोसावी सर यांनी तबला विशारद स्पर्धेत प्राप्त केलेल्या यशाबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दर्शना सामंत मॅडम व श्री. शिरोडकर सर यांनी प्रभावीपणे केले.

ruchira top