मालवण | प्रतिनिधी : दशावतार कला आणि कलाकार प्रेमी, मालवण यांच्या वतीने लौकीकप्राप्त अभ्यासू कलाकारांच्या संचात संयुक्त दशावतार नाट्यप्रयोग पौराणिक कथेवर आधारित 'शिव अजमिढ संग्राम' (अर्थात अजमिढ शरसेतू) रविवार १२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता दैवज्ञ भवन हॉल, फोवकांडा पिंपळ, मालवण येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या माध्यमातून दशावतार कलेची परंपरा आणि पौराणिकनाट्य संस्कृती जपण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.या नाट्यप्रयोगात दत्ताप्रसाद शेणई , बाबा मयेकर, मोरेश्वर सावंत, नीलकंठ सावंत, सागर गावकर, महेंद्र कुडव, सुहास (मामा) माळकर, उदय मोर्ये, चारुहास मांजरेकर, प्रशांत मयेकर, सुयश ठाकूर, शिवा मेस्त्री आणि प्रथमेश सामंत हे कलाकार भूमिका साकारणार आहेत. तर हार्मोनियम, गुणाजी घाडीगावकर, मृदंगमणी, किसन नेमळेकर आणि तालरक्षक,हरेश नेमळेकर हे संगीत साथ देणार आहेत.विविध भूमिका अनुभवी कलाकार साकारणार असून, वेषभूषा, रंगभूषा आणि प्रभावी संवादफेकीमुळे हा प्रयोग रसिकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून संगीत अलकार श्री दिलीप प्रभाकर ठाकूर,तबला विशारद् श्री सुधीर मच्छिन्द्र नाथ गोसावी, नाट्य अभिनेत्री, शुभदा सचिन टिकम,तसेच तरुण भारत पत्रकार श्री मनोज चव्हाण, ह्यांच्या पत्रकारिता प्रवासाची दखल घेऊन त्यांचा ही सन्मान,करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दशावतार कला आणि कलाकार प्रेमी, मालवण यांनी तयारी पूर्ण केली असून, बालकृष्ण दशावतार नाट्य मंडळ, कोळंब यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. सर्व रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पौराणिक नाट्य प्रयोगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मालवणात १२ रोजी 'शिव अजमिढ संग्राम' संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचे आयोजन
