Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

रोटरी क्लब मालवण अध्यक्षपदी नीलम जोशी, सचिवपदी प्रविणा शिंदे, खजिनदारपदी प्रदीप सामंत

रोटरी क्लब मालवण अध्यक्षपदी नीलम जोशी, सचिवपदी प्रविणा शिंदे, खजिनदारपदी प्रदीप सामंत


रोटरी क्लब मालवणच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा १० जुलै रोजी पदग्रहण सोहळा

मालवण :
रोटरी क्लब मालवण वर्ष २०२६-२७ चा नूतन पदाधिकारी पदग्रहण सोहळा १० जुलै २०२६ रोजी कोळंब येथील 'समर्थ मंगल कार्यालय' येथे सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे आणि पदग्रहण अधिकारी म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे माजी प्रांतपाल अविनाश पोतदार उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते रोटरी क्लब मालवण अध्यक्ष नीलम जोशी, सचिव प्रविणा शिंदे, खजिनदारपदी प्रदीप सामंत यांसह नूतन कार्यकारिणीला पदभार सोपवला जाईल. तसेच या प्रसंगी सहाय्यक प्रांतपाल अभिषेक माने यांची देखील उपस्थिती लाभणार आहे.

नूतन कार्यकारिणी : बोर्ड ऑफ डायरेक्टर २०२६-२०२७

प्रेसिडेंट - रो. नीलम जोशी

व्हाईस प्रेसिडेंट - रो. उमेश सांगोडकर


सेक्रेटरी - रो. प्रविणा शिंदे

जॉईंट सेक्रेटरी - रो. तनिष्का कासवकर


ट्रेझरर - रो. प्रदीप सामंत

इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट - रो. पंकज पेडणेकर

क्लब सर्व्हिस - रो. सुहास ओरसकर
कम्युनिटी सर्व्हिस - रो. डॉ. लीना लिमये
व्होकेशनल सर्व्हिस - रो. ऋषिकेश पेणकर
इंटरनॅशनल सर्व्हिस - रो. डॉ. अजित लिमये
युथ सर्व्हिस - रो. अभय कदम
रोटरी फाउंडेशन - रो. प्रदीप जोशी
मेंबरशिप डेव्हलपमेंट - रो. बाळू तारी
क्लब ॲडमिन - रो. महादेव पाटकर
क्लब बुलेटिन - रो. सुविधा तिनईकर
सार्जंट ॲट आर्म्स - रो. कमलिनी प्रभू
स्पोर्ट्स चेअरमन - रो. अमेय पारकर
क्लब ट्रेनर - रो. भाऊ साळगावकर
लिटरसी प्रमोशन - रो. रमाकांत वाक्कर
क्लब फेलोशिप - रो. उमेश हळदणकर

याप्रसंगी रोटरी क्लब मालवणच्या वर्ष २०२५-२६ चे मावळते अध्यक्ष पंकज पेडणेकर, मावळते सचिव रंजन तांबे आणि मावळते खजिनदार चंद्रशेखर पेंडूरकर हे आपली जबाबदारी नूतन कमिटीकडे सुपूर्द करतील.

रोटरी क्लब मालवणने या सोहळ्याच्या निमित्ताने एक आदर्श आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांना व हितचिंतकांना आवाहन करण्यात आले आहे की, नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देताना कोणतेही गुलाबपुष्प, पुष्पगुच्छ किंवा रोपे आणू नयेत. त्याऐवजी २०० पानी वह्या भेट म्हणून द्याव्यात. जमा झालेल्या या सर्व वह्या गरीब व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीसाठी वितरित केल्या जाणार आहेत.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top