Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांचा यशस्वी पाठपुरावा

नगरसेविका अन्वेषा आचरेकर यांचा यशस्वी पाठपुरावा

वादळी वाऱ्यामुळे खंडित झालेला दांडी परिसरातील वीजपुरवठा सुरळीत

स्थानिक रहिवाशांनी मानले आभार

मालवण | प्रतिनिधी : जोरदार वारे आणि पाऊस यात रविवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मोठी पडझड झाली. यामध्ये विजेचा खांब कोसळल्याने हिंदळेकर वाडी, गर्दे रोड आणि दांडी भागातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. मात्र, लोकप्रतिनिधी आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर काम करत सोमवारी संध्याकाळी ६ वाजता हा वीजपुरवठा यशस्वीपणे सुरळीत केला आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर पालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर यांनी तातडीने या समस्येची दखल घेतली. त्यांनी 'महावितरण' कडे सातत्याने फोन करून आणि प्रत्यक्ष भेटून वीजवाहिन्या दुरुस्त करण्यासाठी पाठपुरावा केला.
हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी प्रतीक्षा पवार आणि त्यांच्या टीमने दिवसभर अथक परिश्रम घेतले. त्यांच्या सोबतीला महावितरणचे कर्तव्यदक्ष अधिकारी सचिन मेहेत्रे आणि श्री. मयेकर यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. तसेच स्थानिक नागरिक शैलेश मयेकर आणि चंद्रकांत मयेकर यांनीही या संपूर्ण कामात मोलाचे सहकार्य केले.

ऐन पावसाळा आणि वादळाच्या दिवसांत अवघ्या २४ तासांच्या आत वीजपुरवठा पुन्हा सुरू केल्याबद्दल हिंदळेकर वाडी, गर्दे रोड आणि दांडी भागातील नागरिकांनी सभापती अन्वेषा आचरेकर, प्रतीक्षा पवार टीम आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत.

rapan bottom