Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

दशावतार कलाकारांच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा..

दशावतार कलाकारांच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा..


सिंधू रत्न योजना किंवा जिल्हा वार्षिक योजनेतून वेशभूषेसाठी आर्थिक मदतीचे आश्वासन

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी नाट्य कलाकारांनी कणकवली येथील प्रहार भवन येथे महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन आपल्या विविध समस्या व प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधले. सिंधू रत्न योजना तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांना वेशभूषा व आवश्यक साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले.

दशावतार ही कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य वारसा असून, दशावतार सादर करताना कलाकारांना आवश्यक असलेली वेशभूषा, मुकुट, दागिने, आणि अन्य साहित्य स्वतःच्या खर्चातून खरेदी करावे लागते. यामुळे कलाकारांवर मोठा आर्थिक भार पडत असल्याची बाब प्रतिनिधींनी पालकमंत्री राणे यांच्या निदर्शनास आणून दिली.

यावर सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधू रत्न योजना तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दशावतारी कलाकारांना वेशभूषा व आवश्यक साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन दिले. तसेच जिल्हा स्तरावरील कलाकारांच्या विविध प्रश्नांचे टप्प्याटप्प्याने निराकरण करण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.या आश्वासनामुळे उपस्थित दशावतारी कलाकारांनी समाधान व्यक्त करत पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.

ruchira top