Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

दांडी शाळेत ग्रामीण रुग्णालय मालवण यांच्या वतीने जनजागृती अभियान..

दांडी शाळेत ग्रामीण रुग्णालय मालवण यांच्या वतीने जनजागृती अभियान..

पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून बचावासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत मार्गदर्शन 

मालवण | प्रतिनिधी : ग्रामीण रुग्णालय मालवण यांच्या वतीने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, मालवण दांडी येथे पावसाळ्यात होणाऱ्या विविध आजारांपासून बचावासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. विविध आरोग्यविषयक सूचना देण्यात देताना विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले. तसेच हिवताप व हत्तरोग या आजारांविषयी माहिती देण्यात आली.

ग्रामीण रुग्णालय मालवण येथील आरोग्य निरीक्षक व्ही. पी. सावंत व क्षेत्र कर्मचारी आर. व्ही. साखरे यांनी हिवताप जनजागृती अभियानांतर्गत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा, मालवण दांडी येथे भेट देऊन विद्यार्थी व पालकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती केली.

यावेळी पावसाळ्यात होणाऱ्या विविध आजारांपासून बचावासाठी घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच हिवताप व हत्तरोग या आजारांविषयी माहिती देण्यात आली. आठवड्यातून मंगळवार हा 'कोरडा दिवस' म्हणून पाळावा, सर्व भांडी घासून-पुसून उपडी ठेवून कोरडी करावीत, पाणी उकळून व गाळून प्यावे, ताजे अन्नपदार्थ खावेत, मच्छरांपासून सुरक्षित राहण्यासाठी शौचालयाच्या पाईपला जाळी लावावी तसेच डबके व रिकाम्या भांड्यांमध्ये पाणी साचू न देण्याचे आवाहन करण्यात आले. यासह विविध आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्वही समजावून सांगण्यात आले.

या कार्यक्रमावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विशाखा चव्हाण, सहकारी शिक्षिका श्रीमती बागवे, श्रीमती राणे, श्रीमती चौकेकर तसेच अंगणवाडी सेविका श्रीमती मोरजकर उपस्थित होत्या.

▪️ अमित खोत, मालवण

ruchira top