Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांची ग्राम महसूल अधिकारी कार्यालय व अंगणवाडीला भेट

विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांची ग्राम महसूल अधिकारी कार्यालय व अंगणवाडीला भेट


सिंधुदुर्गनगरी:
कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी आज कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाला भेट देत महसूल कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी येथील अंगणवाडीला भेट देऊन बालकांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शिक्षण, पोषण आणि सुविधांची माहिती जाणून घेतली.

ग्राम महसूल अधिकारी कार्यालयातील भेटीदरम्यान विभागीय आयुक्त श्रीमती अग्रवाल यांनी प्रलंबित फेरफार नोंदी, वारस नोंदी तसेच इतर महसुली प्रकरणांच्या निपटाऱ्याचा आढावा घेतला. नागरिकांच्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करून प्रकरणे विनाविलंब निकाली काढण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. महसूल सेवा अधिक गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर त्यांनी भर दिला.
यानंतर विभागीय आयुक्तांनी रानबांबुळी येथील अंगणवाडीला भेट देत बालकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक, पोषण व आरोग्यविषयक सुविधांची माहिती घेतली. अंगणवाडीतील चिमुकल्यांशी त्यांनी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. तसेच अंगणवाडीतील वातावरण, शैक्षणिक साहित्य, पोषण आहार आणि बालविकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचीही त्यांनी पाहणी केली.
या प्रसंगी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, कुडाळचे गटविकास अधिकारी मनोज भोगटे, मुख्य सेविका राखी राणे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ruchira top