Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

गवंडीवाडा येथील जलमय रस्त्याची समस्या मार्गी

गवंडीवाडा येथील जलमय रस्त्याची समस्या मार्गी


नगरसेविका शर्वरी पाटकर यांच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील गवंडीवाडा परिसरातील राजा बटाव घर ते बाळू चव्हाण यांच्या घरासमोरील रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून पावसाचे पाणी मोठया प्रमाणात साचण्याची समस्या निर्माण होत होती. यामुळे स्थानिक नागरिकांना आणि पादचाऱ्यांना त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र, स्थानिक नगरसेविका शर्वरी पाटकर यांच्या तत्परतेमुळे आणि पालिका प्रशासनाच्या सहकार्याने हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

गवंडीवाडा येथील या अंतर्गत रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असे. पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही योग्य व्यवस्था नसल्याने या भागाला जणू डबक्याचे स्वरूप येत होते. रस्त्यावरून चालणेही कठीण झाल्यामुळे लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांचे l हाल होत होते. गेली काही वर्षे ही समस्या कायम असल्याने स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. स्थानिक रहिवाशांनी या समस्येकडे स्थानिक नगरसेविका शर्वरी पाटकर यांचे लक्ष वेधले.

नागरिकांची अडचण समजून घेत पाटकर यांनी तात्काळ पावले उचलली. त्यांनी पालिका प्रशासनाशी संपर्क साधून संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळाची पाहणी करण्यास सांगितले. प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर कार्यवाई करण्यात आली. रस्त्याची पातळी सुधारली असून, आता पाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यास मदत झाली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या समस्येचा सामना करत होतो. दर पावसाळ्यात इथून चालणे म्हणजे कसरत असायची. पण नगरसेविका शर्वरी पाटकर यांनी आमची अडचण ऐकून घेतली आणि तात्काळ यावर मार्ग काढला. आता रस्ता स्वच्छ आणि चालण्यायोग्य झाला आहे असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. या महत्त्वपूर्ण आणि जनहितार्थ कामाबद्दल स्थानिक नागरिकांनी एकत्र येत नगरसेविका शर्वरी पाटकर तसेच पालिका प्रशासनाचे मनापासून आभार मानले आहेत.

ruchira top