Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

स्व. संजय नाईक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त पेंडूरमध्ये विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप...

स्व. संजय नाईक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त पेंडूरमध्ये विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप...


पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण

पेंडूर :
स्वर्गीय मुख्याध्यापक संजय नाईक यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त 'संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान, पेंडूर', 'संजय नाईक मित्र मंडळ' व 'नाईक कुटुंबीय' यांच्या संयुक्त विद्यमाने पेंडूर गावात विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते.


यावर्षी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, या सामाजिक जाणिवेतून पेंडूर गावातील सर्व प्राथमिक शाळा व अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप करण्यात आले. या स्तुत्य उपक्रमाचा लाभ जि. प. प्राथमिक शाळा पेंडूर क्र. १, पेंडूर क्र. २, शाळा सोनारवाडी, शाळा खरारे, शाळा पराड, शाळा मोगरणे तसेच या सर्व शाळांच्या परिसरातील अंगणवाड्यांतील चिमुकल्या विद्यार्थ्यांना झाला.

प्रेरणास्थळी अभिवादन व वृक्षारोपण

कार्यक्रमाची सुरुवात स्व. संजय नाईक यांच्या प्रेरणास्थळी उभारलेल्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व अभिवादन करून करण्यात आली. याच प्रसंगी प्रेरणास्थळ परिसरात सोनचाफ्याचे सुगंधी रोप लावून वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. स्व. संजय नाईक यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा सुगंध आजही समाजात दरवळत आहे, त्याचेच प्रतीक म्हणून हे सोनचाफ्याचे रोप लावण्यात आले. आगामी काळात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रतिष्ठानच्या वतीने व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्याचा गौरव व संकल्पपूर्तीची ग्वाही

यावेळी बोलताना डॉ. सोमनाथ परब यांनी स्व. संजय नाईक यांच्या शैक्षणिक, सामाजिक व लोकाभिमुख कार्याचा आढावा घेत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला. त्यांनी स्व. संजय नाईक यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा व समाजोपयोगी संकल्प उपस्थितांसमोर मांडले. "त्या सर्व संकल्पांची पूर्तता करण्यासाठी संजय नाईक स्मृती प्रतिष्ठान सदैव कटिबद्ध राहील," अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी विविध शैक्षणिक, सामाजिक व लोकहिताचे उपक्रम राबविले जात असून, स्व. संजय नाईक यांच्या सेवाभावी कार्याचा वारसा जतन करून तो अधिक व्यापक करण्यासाठी प्रतिष्ठान सातत्याने कार्यरत असल्याचे सांगण्यात आले.


यावेळी संदेश नाईक, श्रावणी नाईक, नेहा परब सरपंच, स्वप्नील मेस्त्री पोलिस पाटील, गीता नाईक, संदीप नाईक, श्रेया नाईक, राजन नाईक, अमित सावंत, प्रदीप आवळेगावकर, दीपा सावंत, सुमित सावंत, प्रकाश सरमाळकर, निलेश हडकर, शेखर फोंडेकर, सुशील राणे, अनिल पाटील, अजित वालावलकर, न्हानू पेंडूरकर, पिंटू वालावलकर, दादा वायंगणकर, सतीश पाटील, अश्विनी पेडणेकर, संतोष हिंदळलेकर, आतिक शेख, सलीम शेख, गजानन सावंत तसेच प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, नाईक कुटुंबीय आणि पेंडूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top