Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

स्मार्ट मिटर बाबत ग्रामीण भागात मोठा असंतोष

स्मार्ट मिटर बाबत ग्रामीण भागात मोठा असंतोष


जबरदस्तीने स्मार्ट मिटर बसवण्याचे प्रकार ; वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी

आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात वेधले सरकारचे लक्ष

मालवण | प्रतिनिधी : स्मार्ट मिटर बाबत ग्रामीण भागात मोठा असंतोष आहे. जबरदस्तीने स्मार्ट मिटर बसवण्याचे प्रकार घडत आहेत. वीज ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. तरी सरकारने लक्ष द्यावे या समस्येचा निवारा करावा. असे सांगत याबाबत ठाम भुमिका आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात मांडली.

जनतेच्या या महत्वाच्या प्रश्ना बाबत आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात वेधले सरकारचे लक्ष वेधले.आमदार निलेश राणे म्हणाले जबरदस्तीने बसवण्यात येणाऱ्या स्मार्ट मिटर बाबत सर्वच ठिकाणी मोठया प्रमाणात तक्रारी आहेत. माझा मतदारसंघ ग्रामीण भागात येतो त्याच धर्तीवर अनेक मतदार संघात स्मार्ट मिटर संघर्ष सुरु आहे. अधिकारी मार खातील अशी परिस्थिती प्रत्येक जिल्ह्यात आली आहे. ते होऊ नये, हे सगळे थांबावे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे.

स्मार्ट मिटर बाबत 4 टक्के तक्रारी आहेत हे सगळे खोटे आहे. 50 टक्के वर तक्रारी आहेत मात्र खालचे अधिकारी मंत्रालयात याबाबत माहिती देत नाहीत.ग्राहकांच्या जुना मिटर नादुरुस्त झाल्यास दुरुस्ती नावाखाली हे लोक जातात आणि स्मार्ट मिटर लावतात. ग्राहकांची परवानगी घेतली जात नाही. या नंतर वीज बिलात मोठया प्रमाणात वाढ होते अश्या अनेक तक्रारी जनतेतून येत आहेत. माझ्या मतदार संघातील वीज ग्राहकांच्या शेकडो तक्रारी मी आणून देऊ शकतो.

स्मार्ट मिटर बाबत अनेक तक्रारी ग्रामीण भागात आहेत. तरी त्याची सुधारणा व तक्रारी निवारण बाबत तिकडचे अधिकारी काहीही करू शकणार नाही.स्मार्ट मिटर बाबत ग्रामीण भागात मोठा असंतोष आहे. त्याचा निवारा करण्यासाठी सरकारने लक्ष द्यावे. अशी भुमिका आमदार निलेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनात मांडली.

ruchira top