Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मालवण नगरपरिषदकडून शहरात डास प्रतिबंधक फवारणी मोहीम

मालवण नगरपरिषदकडून शहरात डास प्रतिबंधक फवारणी मोहीम


सर्व प्रभागांमध्ये व्यापक प्रमाणात मोहीम राबवली जाणार

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरात गेल्या काही दिवसांत डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची शक्यता लक्षात घेता, मालवण पालिकेने तातडीने पावले उचलली आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण यांच्या संकल्पनेतून मालवण पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरात व्यापक स्तरावर डास प्रतिबंधक फवारणी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

शहरातील वाढत्या डासांना आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने संपूर्ण शहराचा कृती आराखडा तयार केला आहे. त्यानुसार, शहरातील सर्व प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने डास फवारणी केली जाणार आहे, जेणेकरून एकही परिसर सुटणार नाही.
या फवारणी मोहिमेच्यावेळी आरोग्य सभापती पूनम चव्हाण, स्थानिक नगरसेविका नीना मुंबरकर, स्वच्छता निरीक्षक संजय पवार, मुकादम श्री. वळंजू यांच्यासह पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि फवारणी पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही पालिकेची प्राथमिकता आहे. शहरात कुठेही डासांची उत्पत्ती होणार नाही यासाठी पालिकेचे कर्मचारी पूर्ण क्षमतेने काम करत आहेत. नागरिकांनीही आपल्या घराच्या परिसरात पाणी साचू न देता पालिकेच्या या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

आरोग्य सभापती पुनम यांच्या संकल्पनेतून अधिक व्यापक प्रमाणात मालवण शहरातील परिसरात डास निर्मूलन औषध फवारणी करण्यात येत आहे. मागील काही वर्षात ही फवारणी फक्त घरच्या आसपास तसेच शौचालये आसपास इतकीच केली जात होती. परंतु या वर्षी यात वाढ करण्यात आली आहे. गटारे, रस्ता आसपास असलेली झाडी झुडपे पूर्ण मार्गालगत मोठ्या प्रमाणात असलेली चझाडी या सर्वांवर मशीन च्या माध्यमातून फवारणी करण्यात आली आहे.

*शहर विकास व नागरिकांच्या सेवा सुविधासाठी नगरपरिषद कटीबद्ध*

आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांना अधीकाधीक सेवा सुविधा देण्यासाठी मालवण नगरपरिषद कटीबद्ध आहे. सध्यस्थितीत राबवण्यात येणारी ही डास प्रतिबंधक फवारणी मोहीम संपुर्ण परिसरात व्यापक प्रमाणात राबववली जाईल असे नगराध्यक्षा ममता वराडकर व सभापती पुनम चव्हाण यांनी सांगितले.

ruchira top