Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवणच्या प्राथमिक शाळा आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे गंधर्व महाविद्यालयाच्या संगीत परीक्षेत यश

भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवणच्या प्राथमिक शाळा आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे गंधर्व महाविद्यालयाच्या संगीत परीक्षेत यश


मालवण | प्रतिनिधी : अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ आयोजित एप्रिल-मे २०२५-२६ सत्रातील शास्त्रीय संगीत परीक्षेत मालवण भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. विविध गायन, हार्मोनियम व तबला परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी तसेच विशेष योग्यता श्रेणी प्राप्त करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

भंडारी एज्यूकेशन सोसायटी प्राथमिक शाळेतील गायन प्रारंभिक परीक्षेत श्रीनिधी तारी, आरोही शिंदे, गार्गी मडये आणि विजय सारंग या विध्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर योगिता चव्हाण, वीर कांबळी आणि स्वरा कांदळगावकर या विध्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली.

गायन प्रवेशिका पूर्ण परीक्षेत हायस्कूलच्या रिद्धी मडये, श्रेया शिंदे आणि रेणुका चव्हाण या विध्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, तर वैष्णवी आंबेरकर, खुशी सावंत, पूर्वा चोपडेकर, नागेंद्र तारी आणि कृपा साळगावकर या विध्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी प्राप्त केली.

हार्मोनियम प्रवेशिका प्रथम परीक्षेत यशश्री मोरजकर हिने प्रथम श्रेणी, तबला प्रारंभिक परीक्षेत विघ्नेश वालावलकर याने विशेष योग्यता श्रेणी, तर तबला प्रवेशिका पूर्ण परीक्षेत हिमांशू मालवणकर याने प्रथम श्रेणी मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले.

या सर्व विद्यार्थ्यांना संगीत शिक्षक श्री. विजय बोवलेकर आणि श्री. मंगेश कदम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर,चेअरमन सुधीर हेरेकर मुख्याध्यापक आर डी बनसोडे प्राथमिकचे मुख्याध्यापक भूपेश गोसावी तसेच मार्गदर्शक शिक्षक, सर्व यशस्वी विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

ruchira top