मालवण : शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदर परिसरातील शाळांमध्ये विध्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. 



पडेकाप. अपराजवाडी, लबदेवाडी-साटमवाडी, तेरइवाडी पालकरवाडी, सडेवाडी, चिंदरबाजार, कुंभारवाडी, भटवाडी या शाळांमध्ये वह्या वाटप करण्यात आले. 



यावेळी शिवसेना आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे, उपतालुका प्रमुख मंगेश गांवकर, चिंदर विभाग प्रमुख भाऊ हडकर, सोशल मीडिया प्रमुख मनोज हडकर, दत्ता वराडकर, शशिकांत नाटेकर, श्री. साटम यांसह अन्य पदाधिकारी, शिक्षक, पालक, विध्यार्थी उपस्थित होते.

