Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

मालवण तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समिती सभेत कृषी विकासाच्या विविध उपक्रमांचे नियोजन

मालवण तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समिती सभेत कृषी विकासाच्या विविध उपक्रमांचे नियोजन


मालवण | प्रतिनिधी :
मालवण तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समितीची सभा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सदर सभेच्या अध्यक्षस्थानी शेतकरी सल्ला समितीचे अध्यक्ष श्री. प्रताप चव्हाण (धामापूर) उपस्थित होते.

सभेमध्ये आत्मा अंतर्गत सन २०२६-२७ मध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध कृषी विस्तार कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यामध्ये कृषी प्रात्यक्षिके, संलग्न विभागांची प्रात्यक्षिके, आंतरराज्य, राज्यांतर्गत व जिल्ह्यांतर्गत शेतकरी प्रशिक्षण व अभ्यास दौरे, शेतीशाळा, किसान गोष्टी तसेच शेतकऱ्यांसाठी विविध ज्ञानवर्धक उपक्रमांचा समावेश आहे. या कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक नियोजन व मार्गदर्शन करण्यात आले.

याशिवाय कृषी यांत्रिकीकरण, फळबाग लागवड योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग उन्नतीकरण योजना (PMFME) तसेच शेतकरी हिताच्या विविध योजनांची तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. उपस्थित सदस्यांनी योजनांचा लाभ अधिकाधिक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी तसेच समिती सदस्य राजन गावडे (चौके), राजेंद्र नाईक (कुणकवळे), चंद्रकांत गोलतकर (पळसंब), सुभाष बिरमोळे (घुमडे), भानजी गावडे (आंबडोस), राधा वरवडेकर (आंबडोस), सानिका मुळे (चिंदर), शंकर गावडे (तिरवडे) उपस्थित होते. तसेच तालुका कृषी अधिकारी, मालवण अर्जुन जाधव व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक निलेश गोसावी यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

सभेत उपस्थित मान्यवरांनी कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली. आगामी वर्षात तालुक्यात कृषी विकासाला चालना देणारे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


ruchira top