Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

सिंधुदुर्गात ५,११८ कर्जखात्यांची तपासणी पूर्ण

सिंधुदुर्गात ५,११८ कर्जखात्यांची तपासणी पूर्ण


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६

शेतकऱ्यांनी ऑनलाइन आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील एकूण ५ हजार ११८ कर्जखात्यांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यापैकी ४ हजार ८ कर्जखाती पात्र ठरली असून, आतापर्यंत ३ हजार ९५६ खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली असल्याची माहिती ही माहिती सहायक निबंधक सुनिल मरभळ यांनी दिली.
योजनेच्या अंमलबजावणीसाठी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेतील थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची माहिती शासकीय लेखापरीक्षकांमार्फत तपासण्यात आली. या तपासणीनंतर पात्र ठरलेल्या कर्जखात्यांची माहिती शासनाने उपलब्ध करून दिलेल्या विशेष पोर्टलवर अपलोड करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रीयीकृत, व्यापारी आणि ग्रामीण बँकांमधील कर्जखात्यांची माहिती संबंधित बँकांच्या प्रधान कार्यालयांकडून शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया स्वतंत्रपणे राबविण्यात येत आहे.
बँकांकडून माहिती अपलोड झाल्यानंतर शासनाकडून संगणकीय प्रणालीद्वारे सर्व माहितीची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी पात्र ठरलेल्या कर्जदारांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. या याद्या निबंधक कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था तसेच स्थानिक स्तरावर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार सेवा सुविधा केंद्रामार्फत ऑनलाइन आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच योजनेअंतर्गत पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याने पात्र शेतकऱ्यांनी संबंधित सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ruchira top