Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

गोळवण वरची गावडेवाडी येथील सभागृहाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

गोळवण वरची गावडेवाडी येथील सभागृहाचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

गोळवण गावचा विकास आमदार वैभव नाईकच करू शकतात; ग्रामस्थांना विश्वास.

मालवण : मालवण तालुक्यातील गोळवण वरची गावडेवाडी येथील ग्रामस्थांना आमदार वैभव नाईक यांच्या स्थानिक विकास निधीतून सुमारे ५ लाख रु. खर्चाचे सामाजिक, सांस्कृतिक सभागृह बांधून देण्यात आले आहे.या सभागृहाचा उद्घाटन सोहळा काल आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्य मेघा गावडे यांच्या हस्ते करण्यात आला.आमदार वैभव नाईक यांच्या कामाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला व गोळवण गावचा विकास फक्त आमदार वैभव नाईकच करू शकतात असा विश्वास व्यक्त करत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना मोठ मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा समजून घेतल्या.सभागृहासाठी विशेष मेहणत घेणाऱ्या उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण व दिवंगत शाखाप्रमुख सुभाष सामंत यांचेही ग्रामस्थांनी आभार मानले.
यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की नारायण राणे हे ५ वर्ष केंद्रीय मंत्री,राज्यसभा खासदार, तसेच या जिल्ह्याचे विद्यमान खासदार आहेत तसेच निलेश राणे देखील ५ वर्ष खासदार होते त्यांनी आपल्या कार्यकाळात कोणतीच विकास कामे केली नाहीत याउलट मी केवळ आमदार असुन लाखो रुपयांचा निधी गोळवण गावच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला आहे तसेच राणे हे जनतेला कधीच सहज उपलब्ध होत नाहीत हे तुम्हा जनतेलाही माहीत आहे मात्र मला भेटण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज लागत नाही हे सर्वश्रुत आहे तसेच गोळवण
वासियांच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असुन आपण सर्वांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवावा असे आवाहन आमदार वैभव नाईक यांनी गोळवण वासियांना केले आहे.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, पराग नार्वेकर,विभागप्रमुख विजय पालव,उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण,रुपेश वर्दम,मंडाळाचे अध्यक्ष सुनील गावडे,आनंद चिरमुले,अमित भोगले,माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण,उपसरपंच दादा गावडे, राजू नाडकर्णी,दिगंबर सावंत,मेघा गावडे, मुरारी गावडे,आदीओम लाड,प्रभाकर गावडे,रामु ओवळेकर,विलास गावडे,सुशील गावडे, दिपक गावडे,बाळा गावडे,दिनेश गावडे, पप्पू सावंत,सुरेश गावडे,समीर लाड,गुरुनाथ पालव,गणेश मुणगेकर
बंड्या वाडकर,अक्षय दाभोळकर, भाई फनसातले आदी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

rapan bottom