मालवण पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय व ग्रामपंचायत पळसंब यांच्या वतीने आयोजन
मंगेश नलावडे | मालवण : मालवण पंचायत समिती मालवण तालुका कृषी कार्यालय मालवण आणि पळसंब ग्रामपंचायत यांच्या वतीने कृषी दिन शेतकरी मेळावा प्राथमिक शाळा पळसंब येथे बुधवारी मोठया उत्साहात संपन्न झाला. 
यावेळी व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हापरिषद वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, सौ. प्रज्ञा चव्हाण,उपसभापती घनशाम झाड, गटविकास अधिकारी परागिणी पाटील, तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव, सहा. गटविकास अधिकारी पी. आर. सावंत, जि प सदस्या क्षमा हडकर, पस सदस्य दिपक चव्हाण, प स सदस्य दीपक सुर्वे, पस सदस्य गणेश तोंडवळकर, योजना कांबळी, मानसी भोगावकर, सीमा परुळेकर, पशुधन अधिकारी सुधीर कानसे,किर्लोस विज्ञान केंद्राचे विकास धामापूरकर, पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर, विस्तार अधिकारी व्हि. के.जाधव यांसह मान्यवर उपस्थित होते.
बदलत्या वातावरणाचा शेतीवर परिणाम होऊ नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरा. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी जील्हा परिषद व पंचायत समिती मधून जास्तीत जास्त योजना राबविण्यावर सातत्याने आग्रही असतात. मालवण तालुक्यासाठी जास्तीचा निधी कृषी विभागाला देण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे प्रतिपादन जि. प. वित्त व बांधकाम सभापती संतोष साटवीलकर यानी पळसंब येथे केले. 

सभापती प्रज्ञा चव्हाण यानी शुभेच्छा देताना सेंद्रिय शेती करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी एकतरी गोमाता पाळावी. पंचायत समिती स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य शेतकऱ्यांना मिळेल असा विश्वास व्यक्त केला.
प स कृषी विस्तार अधिकारी व्ही के जाधव यानी पळसंब येथे 1 हजार किलो हळद कंद उपलब्ध केल्या बद्दल ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत गोलतकर यांचे आभार मानले. कृषी सेवक विवेक रंगे यानी अल निनो बाबत तर शेतकरी प्रमोद सावंत यानी सेंद्रिय शेती बाबत मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी अर्जुन जाधव,
पशुधन अधिकारी सुधीर कानसे, किर्लोस विज्ञान केंद्राचे विकास धामापूरकर यांनीही बहुमोल मार्गदर्शन केले.
दिपक चव्हाण, क्षमा हडकर व मान्यवरानी शुभेच्छा दिल्या. यावेळी शेतकऱ्याना सन्मानित करण्यात आले. यामध्ये पीक स्पर्धा (भात ) विजेते पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा तसेच विविधी योजना उत्कृष्ट पणे राबविणाऱ्या अधिकारी वर्गाचा सत्कार करण्यात आला. यात श्रावण येथील श्री.संतोष रघुनाथ परब,यांनी वाण रत्नागिरी उत्पादन १११ क्विंटल, पराड येथील श्री उल्हास पाटकर, वाण रत्नागिरी उत्पादन १०७.३०० क्विंटल, असगणी येथील शयामसुंदर परब,वाण रत्नागिरी उत्पादन ९७.६०० क्विंटल, पंचायत समिती पुरस्कार वितरण आदर्श प्रगतशील शेतकरी श्रीमती.रतिका विजय गोलतकर,( हळद लागवड), बायोगॅस, सेंद्रिय खत कार्यक्रम,श्री.सुनील प्रभुदेसाई, ग्रामपंचायत अधिकारी श्रावण, बायोगॅस ,सेंद्रिय खत कार्यक्रम, प्रकाश सुतार, ग्रामपंचायत अधिकारी देऊळवाडा, बायोगॅस,सेंद्रीय खत कार्यक्रम श्रीम.अर्पिता शेलटकर, ग्रामपंचायत अधिकारी काळसे, पंचायत समिती पुरस्कार म.न.रे.गा.( MREGS) उत्कृष्ट कामगिरी सन 2025-26 सर्वाधिक मनुष्य दिन निर्मिती दिगंबर जाधव ,ग्रामरोजगर सहाय्यक ग्रामपंचायत चिंदर, नंदादीप दळवी, ग्रामरोजगर सहाय्यक, ग्रामपंचायत तळगाव,रामकृष्ण नाईक, ग्रामरोजगार सहाय्यक ग्रामपंचायत गोळवण, सतीश कांबळी, ग्रामरोजगार सहाय्यक ग्रामपंचायत खरारे- पेंडूर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विस्तार अधिकारी श्री. हांडे, ए. एम. परब, सुधीर गायकवाड, श्रीमती खोबरेकर, उपसरपंच अविराज परब, पो पाटील पूनम गोलतकर, ग्रामपंचायत अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी,सर्व सहाय्यक कृषि अधिकारी, कृषी सेवक व आत्मा कर्मचारी, सरपंच, ग्रामपंचायत कर्मचारी, शेतकरी उपस्थित होते. प्रास्ताविक गटविकास अधिकारी परागिणी पाटील यानी तर सूत्रसंचलन आणि आभार मंडळ कृषी अधिकारी श्रीपाद चव्हाण यांनी मानले.
▪️अमित खोत | मालवण

