सातवी पर्यत शाळा मात्र शिक्षक उरले दोनच ; जादा शिक्षक द्या अन्यथा मुलांना शाळेत पाठवणार नाही
पूर्वीचे शिक्षक पुन्हा द्या अथवा नवीन शिक्षक द्या पालकांची आक्रमक भुमिका
जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खालची तोंडवळी
मालवण : मालवण तालुक्यातील तोंडवळी खालची वाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा ठाम निर्णय ग्रामस्थ व पालकांनी घेतला आहे. सातवी पर्यत असलेल्या यां शाळेत सध्या २८ विद्यार्थी असून केवळ दोन शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
खालची तोंडवळी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत २८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी सध्या केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत. एवढ्या कमी शिक्षकांमुळे प्रत्येक विद्यार्थ्याकडे आवश्यक तेवढे लक्ष देता येत नसून अध्यापनाच्या गुणवत्तेवर परिणाम होईल असे पालकांचे म्हणणे आहे.
यापूर्वी शाळेत कार्यरत असलेले अजून एक शिक्षक दुसरीकीकडे नियुक्ती करण्यात आले. मात्र आमच्या शाळेवर अन्याय होत आहे. त्यांची पुन्हा नियुक्त होईपर्यंत अथवा शासनाने तातडीने आणखी शिक्षकांची नियुक्ती करेपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार नसल्याचा निर्णय पालकांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन शिक्षण विभागाने त्वरित शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
शाळेतील बंद झालेला सातवी वर्ग गेल्या वर्षी यां शाळेला पालकांनी पुन्हा जोडून घेतला आपली मुले दाखल केली. मराठी शाळेत मुले शिकावी यां भावानेतून आम्ही आमच्या मुलांना शाळेत दाखल करतो. मात्र मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असेल तर आम्हाला विचार करावा लागेल. असेही पालकांनी सांगितले. शिक्षण विभागाने यात लक्ष घालावे अन्यथा आम्ही मुलांना शाळेत पाठवणार नाही असे सांगत पालकांनी उपस्थित शिक्षकांना निवेदन दिले.
यावेळी सौ. जान्हवी पराडकर, सुरेंद्र मालंडकर, सौ. केतकी मायबा, सौ. अनुष्का जुवाटकर, सौ. शमिका धुरी, सौ. मनस्वी चोडणेकर, सौ. गायत्री रेवंडकर, सौ. दुर्वा मायबा, सौ. प्रिया तोरस्कर, गणपत शेलटकर, अप्सरा कोचरेकर, आनंद कोचरेकर, सौ. नम्रता कोचरेकर, गणेश रेवंडकर, नीलिमा रेवंडकर, अनिरुद्ध जुवाटकर, पुंडलिक मालांडकर, संजय तारी, नंदकुमार कोचरेकर आदी पालक उपस्थित होते.
▪️अमित खोत | मालवण

पालक संतप्त | शाळेत मुले न पाठवण्याचा सामूहिक निर्णय
