Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

रेकोबा हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी एच. डी. गांवकर यांची 107 वी जयंती वृक्षारोपण करून साजरी

रेकोबा हायस्कूलमध्ये शिक्षणमहर्षी एच. डी. गांवकर यांची 107 वी जयंती वृक्षारोपण करून साजरी


मालवण | प्रतिनिधी : बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून ग्रामिण भागात ज्या शिक्षण महर्षीनी शिक्षण संस्थांची स्थापना केली, त्यात शिक्षण महर्षी स्वर्गीय एच डी गावकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे एच डी गावकर हे जसे शिक्षण प्रेमी होते तसेच ते पर्यावरण प्रेमीही होते म्हणूनच दरवर्षी वृक्षारोपण करून त्यांची जयंती साजरी केली जाते. त्यांनी निसर्गावर प्रेम करा असा संदेश दिला असे प्रतिपादन मालवण वायरी येथील श्री रेकोबा हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय खोचरे यांनी येथे बोलताना केले.

मालवण वायरी येथील श्री रेकोबा माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक शिक्षण महर्षी स्वर्गीय एच डी गावकर यांची १०७ वी जयंती प्रशाळेच्या आवारात वृक्षारोपण करून साजरी करण्यात आली.

यावेळी सहाय्यक शिक्षक नंदकिशोर डगरे यांनी एच डी गांवकर यांचे सामाजिक,शैक्षणिक कार्य आदर्शवत असून,नेता कसा असावा याचे उत्तम उदाहरण आहे.समाज जडणघडणीसाठी त्यांच्या कार्याचा सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे असे सांगितले.
या प्रसंगी 'एक पेड माँ के नाम ' या उपक्रमांतर्गत झाड लावणाऱ्या मुलांचे कौतुक करण्यात आले. दुर्वा झाड,मोहित अंधारी,कौस्तुभ पेडणेकर,रचना गोसावी, दिवाकर गोसावी, तन्मय देऊलकर इत्यादी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक झाड लावून उपक्रमास हातभार लावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीनाथ फणसेकर यांनी केले तर आभार प्रवीण कुबल यांनी मानले. यावेळी प्रशालेचे शिक्षक, संभाजी कोरे,रामचंद्र गोसावी,रोहिणी दिघे,मिताली मोंडकर,यशवंत गावकर, दत्तात्रय गोसावी तसेच विद्यार्थी वर्ग ही उपस्थित होते.

ruchira top