मनसे पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ नेत्यांकडे मागणी
जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली माहिती
निलेश जोशी | कुडाळ : कुडाळ-मालवणच्या मतदारांनी गेली अनेक वर्षे संधी देऊन सुद्धा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आजही रस्ता, पाणी-विज मुलभूत प्रश्न सोडविण्याची आश्वासन देणाऱ्यांना मतदारांनी यावेळी घरी बसवावे. तसेच या जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासोबतच रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस तथा मनसे सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक कुडाळ तालुक्यातील आंब्रड गावचे सुपुत्र गजानन राणे यांनी कुडाळ मालवण मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे. अशी माहिती उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली आहे.
कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, गेली पंचवीस वर्षे सलग आणि आत्ता खासदार म्हणून नारायण राणे यांनी राज्यात व केंद्रात मंत्री पदे भुषविली तरी देखील आजही कुडाळ शहरी भागातील लोक एमआयडीसी भागात शुद्ध हवा घेण्यासाठी मॉर्निंग वॉकला जातात ही शोकांतिका आहे. . यातच गेल्या 30/35वर्षात एमआयडीसीच्या माध्यमातून किती रोजगार उपलब्ध झाला याची नोंद घेण्यासारखी आहे.त्याचप्रमाणे सध्या कुडाळ मालवणच्या मतदारांनी सलग 10वर्षे वैभव नाईक यांना आमदारकीची संधी दिली. त्यातली साडेसात वर्षे सत्तेत यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री असुनही गेली दहा वर्षात मतदार संघातील एमआयडीसी भागात एकही उद्योग आणु शकले नाहीत.
तसेच सद्यपरिस्थितीत विद्यमान आमदार वैभव नाईक व भारतीय जनता पक्षाकडून इच्छुक उमेदवार निलेश राणे हे आचारसंहिता लागण्याच्या चार आठ दिवस आधी कोट्यावधी रुपयाच्या विकास कामे ज्यांच्यासाठी निधी उपलब्धेबाबत साशंकता आहे अशा विकास कामांची भूमिपूजन करून आजही रोजगार प्रश्न अनुत्तरीत ठेवून वर्षानुवर्षे त्याच रस्ते,पाणी व वीज मूलभूत प्रश्नावरच मतदारांना सामोरे जाणार असतील तर मतदारांनी यांना कायमचे घरी बसविले पाहिजे.
त्यामुळेच या जिल्ह्याचा सर्वांगीण विकासासोबतच रोजगाराचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातून महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस तथा मनसे सिंधुदुर्ग जिल्हा पक्ष निरीक्षक कुडाळ तालुक्यातील आंब्रड गावचे सुपुत्र गजानन राणे यांनी कुडाळ मालवण मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.अशी माहिती उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिली आहे.

