Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

सिंधुदुर्ग | सहकारातील कार्यकर्त्यांच्या अनुभवातून जिल्ह्यातील सहकार समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया

सिंधुदुर्ग | सहकारातील कार्यकर्त्यांच्या अनुभवातून जिल्ह्यातील सहकार समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया


सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत सहकार सप्ताह शुभारंभ सोहळा संपन्न

नवीन बहुउद्देशीय सह.संस्थेची स्थापना

सिंधुदुर्ग : बहुउद्देशीय संस्थेमार्फत वेगवेगळ्या संस्थांना कमी खर्चात प्रशिक्षण उपलब्ध होईल त्यातून प्रशिक्षित कर्मचारी वर्ग वेगाने निर्माण होतील त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयी, सुविधा प्रशिक्षण केंद्र यासाठी जिल्हा बँक मदत करेल.सहकार मंडळ व बहुउद्देशीय संस्था एकत्रितपणे जिल्ह्यातील संस्थांना पुढे घेऊन जाण्यास मदत करतील.सहकार क्षेत्रातील काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र आले पाहिजे त्यानिमित्ताने सर्व कार्यकर्त्यांचा अनुभव सर्वांना मिळेल.त्यातूनच आपण जिल्ह्यातील सहकार समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया असे प्रतीपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी ओरस येथे केले.

भारत सरकारच्या सहकार मंत्रालय स्थापनेला पाच वर्षे पूर्ण झाली त्या निमित सहकार सप्ताह शुभारंभ सोहळा सिंधुदुर्ग जिल्हा बँक येथे साजरा करण्यात आला. सहकार सप्ताह शुभारंभ जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सहकार ध्वजारोहण करून केलं.तसेच या दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित सिंधुदुर्ग या नवीन संस्थेची स्थापना करण्यात आली.यावेळी संस्थेची सभा जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालय सभा सभागृहात घेण्यात आली. संस्थेच्या सभा अध्यक्षपदी जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून मनीष दळवी यांची निवड यावेळी करण्यात आली. त्यांच्या हस्ते सहकार अभियान कार्यक्रमाचे दिप प्रज्वलीत करून शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमात प्रथम सहकार गीत गायनाने सहकार अभियान कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम सोहळ्यास माजी आमदार अजित गोगटे,सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहा निबंधक कुडाळ श्री. मरभळ,जिल्हा उपनिबंधक कार्यालय अधिक्शक श्री हिरलेकर, कणकवली संस्था निबंधक श्री.आरेकर, बँक संचालक गजानन गावडे, दिलीप रावराणे रवींद्र मडगावकर,प्रकाश मोर्ये, विठ्ठल देसाई, सौ.प्रज्ञा ढवण,गणपत देसाई,समीर सावंत,विद्याप्रसाद बांदेकर,तुळशीदास रावराणे,नासीर काझी,जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे,नूतन बहूउद्देशीय संस्थांचे कार्यवाह संचालक मंडळ, सभासद, सहकार खात्यातील मान्यवर या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते बहुउद्देशीय संस्थेच्या चेअरमनपदी,संदेश हडकर यांची निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे उपविधी, संस्थेचे कार्य,उद्देशाचे वाचन करण्यात आले

ruchira top