युवा नेतृत्वानाही संधी ; तालुकाध्यक्ष यांची नियुक्तीही जाहीर
मालवण| प्रतिनिधी : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्या युवा नेतृत्व जिल्हा कार्यकारिणीची तसेच तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीची घोषणा ओरोस येथे करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात काँग्रेसची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अरविंद मोडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
जिल्हा उपाध्यक्षपदी मेघनाद धुरी, नागेश मौर्ये, विजय प्रभू, वासुदेव नाईक, आतिष जेठे आणि अनिल डेगवेकर यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हा कोषाध्यक्षपदी मंदार शिरसाठ यांची निवड करण्यात आली असून जिल्हा सरचिटणीस पदी देवानंद लुडबे, राजेंद्र मसुरकर, चंद्रशेखर जोशी, डॉ. विवेक रायकर, रवींद्र म्हापसेकर, कृष्णा धाऊसकर, विधाता सावंत, प्रवीण वरुणकर आणि केतनकुमार गावडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
जिल्हा सचिवपदी संदेश कोयंडे, सुभाष दळवी, ॲड. राजन यादव, शांताराम नेवरेकर, सौ. अमिदी मेस्त्री, सज्जाउद्दीन सोलकर, चंद्रसेन सावंत, संतोष गावकर आणि ॲड. गुरुनाथ आईर यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जिल्हा सदस्य म्हणून विद्याप्रसाद बांदेकर, सुमेधा सावंत, प्रकाश डिचोलकर, तौकीर शेख, सुभाष सावंत, विजय खाडये, नंदकिशोर दळवी, मधुकर लुडबे आणि स्नेहल मेथर यांची निवड करण्यात आली.
तालुकाध्यक्षपदी देवगडसाठी उमेश कुलकर्णी, कणकवलीसाठी प्रदीप मांजरेकर, वैभववाडीसाठी भालचंद्र जाधव, मालवणसाठी जेम्स सायमन फर्नांडिस, कुडाळसाठी अभय शिरसाठ, सावंतवाडीसाठी अभय मालवणकर, वेंगुर्ल्यासाठी वैभव वेंगुर्लेकर आणि दोडामार्गसाठी गुणाजी गवस यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, ज्येष्ठ नेते प्रकाश जैतापकर, विलास गावडे, मेघनाद धुरी यांच्यासह जिल्हा व तालुकास्तरीय अनेक पदाधिकारी उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून पक्ष संघटना अधिक मजबूत करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर निवडणुकांसाठी काँग्रेसला सक्षम करण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर
