Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर मालवण नगरपरिषदेची धडक कारवाई..

बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्यांवर  मालवण नगरपरिषदेची धडक कारवाई..


८ आस्थापनांवर कारवाई ; सुमारे १०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त

मालवण | प्रतिनिधी : पर्यावरण संरक्षण तसेच स्वच्छ व प्लास्टिकमुक्त शहराच्या दृष्टीने मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहर हद्दीत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक (Single Use Plastic - SUP) विरोधात विशेष धडक मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान शहरातील विविध दुकाने, व्यावसायिक आस्थापने तसेच फेरीवाल्यांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधितांकडून ₹५,३०० इतका दंड वसूल करण्यात आला. तसेच सुमारे १०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले.

कारवाईदरम्यान व्यापाऱ्यांना शासनाने घालून दिलेल्या प्लास्टिक बंदीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा तसेच प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या, कप, प्लेट, चमचे व इतर एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंची विक्री अथवा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले.


मालवण नगरपरिषदेकडून अशा प्रकारच्या तपासणी व कारवाया यापुढेही नियमितपणे सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शहर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांनी नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.

▪️अमित खोत, मालवण

ruchira top