भाऊ भोगले | बागायत : खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून माळगाव येथे अनेक विकास कामांना निधी मंजूर करण्यात आला आहे. माळगाव सरपंच सौ. चैताली साळकर यांच्या हस्ते माळगाव गावठणवाडी रस्ता रुंदीकरण व खडीकरण करणे या कामाचे भूमिपूजन श्रीफळ वाढवून सोमवारी सायंकाळी करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सौ राजश्री शेलार, अंकिता कासले, माजी ग्रामपंचायत सदस्य सविता चव्हाण, भाजप कार्यकर्ते आणि उद्योजक श्री दयानंद देसाई, व्यावसायिक चेतन साळकर, भाजपाचे गुरु परब, दीपक बागवे, सुधीर पडेलकर, बाळा वायंगणकर, हरी चव्हाण, साईनाथ परब, सुरज धामापूरकर, पार्थ खोत, भरत शेलार, मनोज चव्हाण, आबा शेलार, शलाका चव्हाण, सुनीता चव्हाण, नमिता चव्हाण, दर्शना बागवे, सेजल बागवे, अंजली शेलार, प्रियांका बागवे, माया वायंगणकर, प्रीतम वांगणकर सुनीता वायंगणकर, भक्ती शेलार, अनिता चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

