Thursday, 29 October 2026
Latest News
मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... मत्स्यव्यवसाय विभागाच्या २४ योजनांसाठी आता ऑनलाइन अर्ज सुविधा आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा...
ruchira top

पिंगुळीत १७-१८ रोजी चित्रकथी रामायण महोत्सवाचे आयोजन

पिंगुळीत १७-१८ रोजी चित्रकथी रामायण महोत्सवाचे आयोजन

नावाजलेले चित्रकथी कलाकार होणार सहभागी

रामायण व चित्रकथी परंपरा यावर होणार चर्चासत्र

निलेश जोशी | कुडाळ : सांस्कृतिक विभाग भारत सरकार यांच्या सहयोगाने व दायती लोककला संवर्धन अकादमी पिंगुळी यांच्या आयोजनातुन दि. १७ व १८ ऑक्टोंबर २०२४ रोजी पिंगुळी येथे चित्रकथी रामायण महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे, चित्रकथी या कला प्रकाराला घेऊन आयोजित होणारा महोत्सव हा इतिहासातील पहिलाच महोत्सव असून हा महोत्सव दोन दिवस चालणार आहे. नामवंत चित्रकथी कलाकार या महोत्सवात सहभागी होणार आहेत.
या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील बाव -बांबूळी मंदिराचे बावलेकर अजय गंगावणे, यांचे सहकारी सुरेश रणसिंग, कुडाळ भैरव मंदिरचे बावलेकर सखाराम गंगावणे, ओरोस रवळनाथ मंदिरचे बावलेकर शिवदास मसगे, संस्कार मसके, घावनळे रामेश्वर मंदिरचे बावलेकर लक्षमन मराठे, यांचे सहकारी सुधाकर रणसिंग गावराई रामेश्वर मंदिरचे बावलेकर रामदास म्हस्कर, भडगाव बिरोबा मंदिरचे बावलेकर श्री विनायक मसगे व अमर मसगे, झाराप भावई मंदिर चे बावलेकर श्री शंकर मसके व शैलेश मसके पिंगुळी रवळनाथ मंदिर बावलेकर लक्ष्मण मसके व विष्णू मसके असे अनेक नामवंत व सध्या कार्यरत असणारे चित्रकथी कलाकार या महोत्सवात सहभागी होत आपली कला सादर करणार आहेत. अशी माहिती दायती लोककला संवर्धन अकादमीचे अध्यक्ष गणपत मसगे यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
या महोत्सवाचा लाभ तालुक्यातील चित्रकथी प्रेमी विद्यार्थ्यांना, कलाप्रेमीना तसेच अभ्यासकांना होणार आहे. तसेच हा महोत्सव कुडाळ तालुक्याच्या सांस्कृतीक परंपरेत मोलाची भर पाडणार ठरणार आहे. या महोत्सवात वैशिष्टपुर्ण अशी चित्रकथी परंपरा, आपणास पाहायला मिळणार आहे, या महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यातील चित्रकथी सादर करणाऱ्या कलाकारांना एका उत्तम असे व्यासपीठ मिळावे यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवात १४ ते १५ चित्रकथी सादर करणारे कलाकार सहभागी होणार असून ते कोकणातील ही पारंपरिक अशी पुरातन कला रसिकांसमोर सादर करणार आहेत.
शनिवार दि.१७ ऑक्टोबर रोजी सायं. ५ वा. उदघाटन सोहळा होणार असून प्रमुख उदघाटक म्हणून प्रोफेसर डॉ. ओमप्रकाश भारती भारत सरकारचे पूर्व सांस्कृतिक राजनिथीक तथा पूर्व निर्देशक ईझेडसीसी कोलकाता, संस्कृति मंत्रालय, भारत सरकार हे उपस्थित राहणार आहेत. तसेच पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, उपसरपंच सागर रणसिंग, जिल्हा ठाकर संघटनेचे अध्यक्ष शशांक अटक, पिंगुळी ठाकर ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भगवान रणसिंग, ठाकर आदिवासी लोककला संवर्धन पर्यटन संस्था अध्यक्ष भास्कर गंगावणे, महापुरुष मित्र मंडळाचे अध्यक्ष गुंडू मसगे , दिग्दर्शक सिने लाईन प्रोडूसर साईनाथ दळवी ठाकरवाडी म्युझियमचे पदाधिकारी तुळशीदास मसगे,अच्युत मसगे, धोंडी ठाकूर हे उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर विविध चित्रकथी सादरीकरण होणार आहे. सायं.६.३० वा. " लवंकुश " सदरकर्ते - सुरेश रणसिंग व विश्वास रणसिंग, ६.४५ वा. " सीता स्वयंवर " सादरकर्ते शंकर मसके व शैलेश मसके, ७.३० वा. "पंचवटी" सादरकर्ते सखाराम गंगावणे व विवेक गंगावणे ८.१५ वा "सुंदरकांड" शिवदास मसगे व संस्कार मसके.
रविवार दि १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वा रामायण व चित्रकथी परंपरा यावर चर्चासत्र होणार आहे. यात ओमप्रकाश भारती, सतीश लळीत, गणपत मसगे, गुंडू मसके, शेखर सामंत,ना.बा.रणसिंग सहभागी होणार आहेत. सायंकाळी ७.३० वा " युद्धकांड "सदरकर्ते- विनायक मसगे व अमर मसगे
सायंकाळी ८ वा "बालकांड "सदरकर्ते- सुधाकर रणसिंग व आनंद ठाकूर, सायंकाळी ८.३० वा " ताटीका वध" सादरकर्ते लक्ष्मण मसके व विष्णू मसके
या चित्रकथी महोत्सवात नामवंत, कलाकार सहभागी होणार आहेत. चित्रकथी हा कलाप्रकार इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये असल्यामुळे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनीही या महोत्सवाचा लाभ घ्यावा व जास्तीत जास्त संख्येने या महोत्सवासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संस्था अध्यक्ष गणपत मसगे व ठाकरवाडी म्युझियम च्या टीमने केले आहे.

rapan bottom