Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी देवबाग येथील संशयितास मे. सत्र न्यायालयात सशर्त जामीन मंजूर

गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीप्रकरणी देवबाग येथील संशयितास मे. सत्र न्यायालयात सशर्त जामीन मंजूर

संशयितातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड यतिश खानोलकर यांनी काम पाहिले

मालवण : मालवण तारकर्ली नाका येथील गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ साठवणुकीच्या गुन्ह्यामधील दुसरा अटक संशयीत ॲलेक्स दुमिंग लुद्रिक वय 26 वर्षे, राह. देवबाग ता..मालवण यास मे. सत्र तथा जिल्हा न्यायाधीश ओरोस यांनी रक्कम रु. 50,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला. संशयितातर्फे ॲड. स्वरुप नारायण पई, ॲड यतिश खानोलकर यांनी काम पाहिले.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांनी मालवण तारकर्ली नाका येथे केलेल्या छाप्याकामी महालक्ष्मी जनरलस्टोरच्या बाजूच्या शेडमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा मिळून आल्याने अमित अशोक सावंत, राह. भरड मालवण याचे विरूद्ध मालवण पोलीस ठाण्यात दि. 03/06/2026 रोजी भारतीय न्याय संहिता कलम 123 व अन्नसुरक्षा आणि मानके कायदा कलम 26(2), 27(3), 30(2) व 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला अटक करण्यात आली होती. त्याचेकडे केलेल्या तपासात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री देवबाग येथील ॲलेक्स लुद्रीक याने केल्याची माहिती मिळताच पोलिसांनीॲलेक्स दुमिंग लुद्रिक वय 26 वर्षे, राह. देवबाग यास दि. 17/06/2026 रोजी अटक करुन मे. मालवण न्यायालयात हजर केले असता मे. मालवण न्यायालयाने संशयीतास दि. 18/062026 रोजीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आरोपीस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

न्यायालयीन कोठडी मंजूर झाल्यानंतर संशयीताच्यावतीने ओरोस येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयात जामीनअर्ज करण्यात आला होता. या जामीन अर्जाचे सुनावणीअंती मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांचे न्यांचे न्यायालयाने संशयीतास रक्कम रु. 50,000/- चा सशर्त जामीन मंजूर केला. यामध्ये संशयीताने तपासकामात ढवळाढवळ न करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे व पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.

ruchira top