Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ..


सिंधुदुर्ग : भारत देशाला पोलिओमुक्त दर्जा प्राप्त झाला असला, तरी ही स्थिती कायम राखण्यासाठी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार दि. २८ जून २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय, कणकवली येथे बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून करण्यात आला.


यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे , कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील तसेच आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

याप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांनी पालकांना आवाहन केले की, पाच वर्षांखालील कोणतेही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये. प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देऊन पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, अंगणवाड्या तसेच विशेष बूथवर लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

या मोहिमेसाठी जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील २७ हजार ८०६ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरात ९०४ लसीकरण केंद्रे, ८० मोबाईल पथके आणि ४३ ट्रान्झिट पथके कार्यरत राहणार आहेत. तसेच २४९ उपकेंद्रे, ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ११ उपजिल्हा/ग्रामीण रुग्णालये आणि जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यामार्फत ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

तसेच दुर्गम भाग, स्थलांतरित कुटुंबे, वीटभट्ट्या व बांधकामस्थळांवरील बालकांपर्यंत विशेष पथकांद्वारे लसीकरण सेवा पोहोचविण्यात येणार आहे.

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व पालकांना आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओचे दोन थेंब पाजून राष्ट्रीय मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ruchira top