Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

पुन्हा एकदा आमदार निलेश राणे यांनी विधिमंडळ 'गाजवले' ; जनहिताच्या प्रश्नांना दिला न्याय..

पुन्हा एकदा आमदार निलेश राणे यांनी विधिमंडळ 'गाजवले' ; जनहिताच्या प्रश्नांना दिला न्याय..


पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात आमदार निलेश राणे यांचीच 'छाप'

अभ्यासू आणि आक्रमक भाषणांची विरोधकांनाही पडली भुरळ

मुंबई :
महाराष्ट्र राज्याच्या सर्वोच्च सभागृहात जनतेचे ज्वलंत प्रश्न मांडून त्यांना न्याय देण्याचे काम आमदार निलेश राणे सातत्याने करत असताना प्रत्येक विषयाची मुद्देसूद मांडणी, वास्तववादी आकडेवारी आणि अभ्यासपूर्ण संवादातील आक्रमकता प्रत्येक अधिवेशनाचा केंद्रबिंदू बनले आहे. जनहिताच्या प्रश्नांना न्याय देत आमदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा विधिमंडळ गाजवले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात आ. निलेश राणे यांचीच छाप दिसून आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या अभ्यासू आणि आक्रमक भाषणांची विरोधकांनाही भुरळ पडली असून आमदार निलेश राणे यांचे जाहीर कौतुक केले आहे.

पावसाळी अधिवेशन आमदार निलेश राणे यांचा आवाज सातत्याने घुमला. लक्षवेधी सूचनेद्वारे सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणातील शेतकरी, बागायतदार व ग्रामस्थांना वन्य प्राण्यांमुळे होत असलेल्या नुकसानीबाबत तसेच वनामध्ये जाण्यासाठी रस्ता करण्यात यावे यासंदर्भात सभागृहात प्रश्न उपस्थित केले. शेती, फळबागा व नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित या गंभीर विषयावर तातडीने उपाययोजना, नुकसानभरपाई प्रक्रिया सुलभ करणे आणि वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवावर ठोस पावले उचलण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी केली. वन मंत्री यांनी दखल घेत तात्काळ उपाययोजना व ठोस पावले उचलली जातील असे स्पष्ट केले.

आमदार निलेश राणे यांनी घरकुल लाभार्थी यांचा ही प्रश्न मांडून त्यांनाही दिलासा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेतून मंजूर घरकुलांची थकीत बिले, वन आरक्षण क्षेत्रातील घरकुलांसाठी जागेची समस्या आणि बांधकामासाठी वाळू उपलब्धतेचा प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घरकुल लाभार्थ्यांची थकीत बिले लवकरात लवकर अदा करण्यात येतील व कोणत्याही लाभार्थ्याचे बिल प्रलंबित राहणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच घरकुल योजनेसाठी गायरान व शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात येईल, नवीन घरकुलांसाठी जमीन खरेदीसाठी प्रति लाभार्थी ₹1 लाखांपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येईल, असे सांगितले. याशिवाय लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मोफत उपलब्ध करून देण्याची तरतूद असून, यामध्ये कोणत्याही प्रकारची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. वन विभागाशी संबंधित अडचणी सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, असेही स्पष्ट केले. यां विषयातही जनतेला न्याय देण्यात आमदार निलेश राणे यशस्वी ठरले.

कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने अदा करण्याबाबत प्रश्न आमदार निलेश राणे यांनी उपस्थित केला. कोकणच्या बागायतदारांचे आर्थिक नुकसान लक्षात घेता शासनाने त्वरीत कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी ठाम मागणी सभागृहात केली. दरम्यान कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना युती सरकार कडून दिलासा मिळाला.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने ₹३३४.९८ कोटींची मदत मंजूर झाली. त्यापैकी कोकण विभागासाठी ₹२०९.१० कोटींची विशेष मदत जाहीर करण्यात आली आहे.
अनेक वर्षांनंतर आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विमा कंपन्यांची रक्कम यात जोडलेली नाही, ती रक्कम दुसऱ्या टप्प्यात मिळेल. एकूणच आंबा काजु उत्पादक शेतकरी यांनाही न्याय मिळवून देण्यात आमदार निलेश राणे यांची सभागृहातील भुमिका महत्वपूर्ण ठरली. सर्वसामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या न्याय हक्कासाठी आमदार निलेश राणे यांचा आवाज प्रत्येक अधिवेशन दाणाणून सोडत आहे. जनतेला महायुती सरकार माध्यमातून न्याय मिळवून देत आहे.

आमदार निलेश राणे यांच्या भाषणांची विरोधकांनाही भुरळ

वस्तुस्थिती मांडायला तळमळ आणि संवेदना लागते, आ. नीलेशजी राणे कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना तीच तळमळ आणि संवेदना दिसून आली. आ. नीलेशजी राणे यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. अश्या भावना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मांडल्या असून जाहीरपणे कौतुक केले आहे. हे पाहता आमदार निलेश राणे यांच्या भाषणांची भुरळ विरोधकांनाही पडली आहे हे निश्चित.

शेकडो कोटी विकासनिधीही मंजूर करून घेतला

विधिमंडळ सभागृह माध्यमातून जनतेला न्याय देत असताना मालवण कुडाळ मतदार संघात सातत्याने कोट्यावधी निधी आमदार निलेश राणे मंजूर करून आणत आहेत. आताही
आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार ADB रस्ते विकास कार्यक्रम अंतर्गत राज्य शासनाकडून सिंधुदुर्गनगरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मालवण देऊळवाडा रस्ता काँक्रीटीकरण करणे कामासाठी ३०५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण कुडाळ गतिमान विकासातून कोटीची उड्डाणे घेत आहे.


▪️अमित खोत | मालवण

ruchira top