Wednesday, 28 October 2026
Latest News
आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा | मच्छी विक्रीतून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या आचरा परिसरातील महिलांना वाहतुकीच्या समस्या कुंभारमाठ ग्रामपंचायतीचा कातकरी कुटुंबांना दिलासा आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण..
rapan bottom

आमदार निलेश राणे यांचा विकासाचा झंझावात सुरूच!

आमदार निलेश राणे यांचा विकासाचा झंझावात सुरूच!


सिंधुदुर्गनगरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते मालवण देऊळवाडा रस्ता काँक्रीटीकरण करणे कामासाठी ३०५ कोटींचा निधी मंजूर

आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार ADB रस्ते विकास कार्यक्रम अंतर्गत राज्य शासनाची मंजुरी

मालवण | प्रतिनिधी :
कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार सिंधुदुर्गनगरी प्रवेशद्वार छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते रानबांबुळी कट्टा चौके ते देऊळवाडा रस्ता या कामासाठी राज्य सरकारने ३०२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. आमदार निलेश राणे यांनी आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली आहे.

या पूर्ण रस्त्याची लांबी ३० की. मी. असून याची ०७ मीटर रुंदीने या रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार आहे. या रस्त्यावरील धोकादायक वळणे व दरडप्रवन भागात संरक्षकभिंती तसेच जीर्ण झालेल्या पुलांच्या जागी नवीन पूल बांधकाम करणे, सखल भागात भर टाकून रस्त्याची उंची वाढविणे इ. प्रकारची कामे होणार आहेत.

हा रस्ता पर्यटनासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरणार असून मालवणमध्ये जाणाऱ्या पर्यटकांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी गेल्या अनेकवर्षांपासून होत होती, त्याची दखल घेऊन आमदार निलेश राणे यांनी आपल्या विकास आराखड्यात या रस्त्याचा समावेश केला होता, राज्य सरकारच्या मंजुरीमुळे आमदार निलेश राणे यांच्या विकास आराखड्यातील महत्वाचे काम पूर्ण झाले असून आमदार निलेश राणे यांनी याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार नारायणराव राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

▪️अमित खोत | मालवण

ruchira top