मालवण : डी.एड कॉलेज मालवण येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
डीएड कॉलेजचे प्राचार्य दत्तात्रय माळी, प्रा. नागेश कदम, प्रा. सौ. पूर्वा शिरसाट प्रा. रमेश वळवी, प्रा. आनंदी घोगळे प्रा. संजय केळूसकर, बार्टीचे समतादूत संग्राम कासले तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.
प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांमधून सागर रेडकर, यतीका जाधव, दिशा चव्हाण, चैताली शिंदे यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याची माहिती दिली. बार्टीचे समतादूत संग्राम कासले यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीता बनसोडे यांनी केले तर आभार सिद्धी राणे यांनी मानले.
▪️अमित खोत | मालवण

मालवण डी.एड कॉलेज येथे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी..
