शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती
मालवण | प्रतिनिधी : आर .ए. यादव हायस्कूल आडवली येथे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत विध्यार्थ्यांना वह्यांचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी दत्ता सामंत यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, जिल्हा सचिव गजानन बाक्रे, माजी सभापती सुनील घाडीगावकर, आडवली हायस्कूलं अध्यक्ष कमलाकांत कुबल, तालुका प्रवक्ते निलेश बाईत, विभागप्रमुख प्रशांत परब, अरविंद साटम, सरपंच संजय आडवलकर, विभागीय सचिव मंगेश यादव, विष्णू घाडीगावकर जगदीश घाडीगावकर, भगवान लाड, भार्गव लाड, आडवली ग्रामपंचायत सदस्या सौ. ज्योती लाड, सदस्य स्वप्नील लाड, ओवळीये शाखा प्रमुख नंदू आंगणे, ग्राप सदस्य बबन परब, प्रकाश कासले, हेमंत पारकर, अतूल तांबे, बाळा राऊत, धनाजी घाडीगांवकर, प्रकाश किर्लोस्कर, आडवली हायस्कुल शिक्षकवृंद कर्मचारी, पालक विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी प्रशालेच्या वतीने दत्ता सामंत यांचा सत्कार करण्यात आला.
▪️अमित खोत, मालवण

शिवसेनेच्या वतीने आर .ए. यादव हायस्कूल आडवली येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप
